शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेड येथील गोळीबार मैदान गाजवले. रामदास कदम यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गावात (खेड) ही जाहीर सभा पार पडली. उद्धव ठाकरे यांची ही जाहीर सभा खेड येथील गोळीबार मैदानावर झाली. या सभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटात जाहीरपणे पक्षप्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. ठाकरे काय म्हणाले या मुद्द्यात जाणून घेऊया….

मी आज तुम्हां सर्व देवमाणसांच दर्शन घ्यायला आलो आहे. ज्यांना आजवर जे जे शक्य ते सर्व दिलं ते खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे, मी तुम्हांला काही देऊ शकत नाही तरी तुम्हीं आलात ही पूर्वजांची पुण्याई.

धनुष्यबाण तुम्हीं चोरला असेल पण तो चोरलात म्हणजे तुम्हाला पेलवेल असे नाही. जिथे रावण उताणा पडला तिथे मिंधे काय पेलणार?

निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर त्यांनी येऊन पहावं. तो चुना लावणारा आयोग. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही, माझ्या वडिलांनी केली आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करणारे हिंदुत्वाच्या, मराठी माणसाच्या एकीवर घाव घालत आहेत. एवढ्या निष्ठुरपणे, निर्घृणपणे वागत आहेत की ज्यांनी सोबत दिली त्यांना संपवत आहेत…

मी ‘शिवसेना’च म्हणणार. पक्ष ते देऊ शकत नाही, आम्हीं देऊ देणार नाही. मैदानाचे नाव छान ‘गोळीबार’, पण शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितलंय, ढेकणाला मारायला गोळीची गरज नसते. बोट पुरतं. तुमच बोटाच मत त्याला पुरेस आहे. ज्यांना आम्हीं मोठ केल त्यांनी आईवर वार केला. शिवसेना आमची आईच आहे.

अधिक वाचा  कुणाल कामराला मोठा दिलासा; बजावलेल्या नोटीसीतील मोठी चूक पथ्यावर शिंदे प्रकरणी अटकेपासून संरक्षण हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

शिवसेना नाव बाजुला ठेवुन लढुन दाखवा. जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांच नाव लावायला लाज वाटत नसेल आणि त्यांना तुम्हीं लावण्यात लाज वाटत नसेल तर लावा. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार कधी ऐकलेही नाहित ते आम्हांला बाळासाहेबांचे विचार शिकवणार?. काय आहेत बाळासाहेबांचे विचार? नोकर्‍या जाऊ द्या हे विचार नव्हते, भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणार्‍या शिवसेनेचा विजय असो हा विचार घेऊन शिवसेनेची स्थापना झाली. कानडी मुख्यमंत्र्यानी डोळे दाखवले की शेपट्या घालुन बसणे हे बाळासाहेबांचे विचार? मी मुख्यमंत्री असताना त्यांची हिंमत नव्हती. दिल्लीसमोर शेपट्या आत घालुन बसणे हे बाळासाहेबांचे कदापि विचार नव्हते.

मी घरात राहुन जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्हीं घरोघरी, अगदी गुवाहाटीला फिरुन सांभाळु शकत नाही आहात. दिल्लित मुजरे मारायला जाण्यात अर्ध आयुष्य जात आहे. ज्याना मंत्रीपद दिली नाहीत त्यांना सांभाळताना उरलेल जातंय. सगळे उद्योगधंदे गुजरातला जात होते कारण गुजरात ला निवडणूका होत्या, आता परवा आयफोनचा कर्नाटकला गेलाय कारण तिकडे आता निवडणूका आहेत.

तुटलेल्या फुटलेल्या एसटीवर हासरे चेहरे टाकुन जाहिराती लावल्या. माझ्या वेळेस ‘माझ कुटुंब, माझी जबाबदारी’ एकच कारण हे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. जे काल परवकडे मिंधे बोलले, बर झालं देशद्रोह्यांसोबत चहापान टळलं. नंतर सारवासारव केली. आम्हीं द्रोही नाही प्रेमी. जीभ हासडून टाकू जर बोलाल तर, हे मी मुख्यमंत्र्यांना नाही, मिंधेंना बोलत आहे.

अधिक वाचा  ताई अण्णांच्या दबावातही दादांचे कोथरूडवर अधिराज्य?; कोथरूड नवनियुक्त मंडल अध्यक्ष ‘टीम दादा’ची छाप

माननीय पंतप्रधानांना पत्र लिहिल आहे. निवडणूक आयोगावर जसा कोर्टाने निर्णय दिला तस या सर्व पोपटांना देखील पिंजर्‍यात टाकण्याची वेळ आली आहे. विरोधी पक्षात असेल तर ते पापी, भ्रष्टाचारी मग आता सर्वाधिक भ्रष्टाचारी भाजपत कारण त्यांना तुम्हीं आता तुमच्या पक्षात घेतलं आहे.

पूर्वी एक जमाना होता कि हिंदुत्वाच पवित्र वातावरण होतं, त्यावेळी भाजपच्या मंचावर साधुसंत दिसत होते, आता संधीसाधु दिसतात. राजनची आणि वैभवची काय संपत्ती आहे? जे आज तिकडे जागतिक स्तरावरील फुटलेल्या घोटाळ्याची चौकशी का करत नाही? यांची काय करता?

मी अभिमानाने सांगतो, मी बाळासाहेबांचा पूत्र आहे, माझे वडील अभिमानाने सांगत, मी प्रबोधनकारांचा पूत्र. आज ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रासाठी राबत आहे. तुमची वंशावळ सांगा. तुमच्या मुलांना कमिट्याचे अध्यक्ष बनवायचे आणि कुटुंब उध्वस्त करायची, घराणी संपवायची? तुम्हाला शिवसेनेचा पक्षप्रमुख मिंधे चालेल का? हे तुम्ही सांगायचं. निवडणूक आयोगाने नाही सांगायच. तुमच्यासारखे किती आले आणि जातील, शिवसेना टिकुन राहणार आहे.

मिंधेच्या हाती धनुष्यबाण होता आणि चेहरा गुन्हेगारासारखा होता. तुमच्या हाती धनुष्यबाण घेण्याचा प्रयत्न करा पण कपाळावर गद्दार आणि हातावर ‘मेरा खानदान चोर हैं|’ हे लिहिलत ते या जन्मात पुसल जाणार नाही. भारतमाता म्हणजे देश. देशातिल माणसं, देश म्हणजे दगडधोंडे नाही. गोमुत्र शिंपडुन देश स्वतंत्र झालेला नाही, स्वातंत्र्यसैनिकांनी स्वत:च्या रक्ताचा अभिषेक करुन देश स्वतंत्र केला आहे. केवळ बेंबीला देठ लावुन कोकलायच ‘भारतमाता की जय’? काय तुमचा संबंध दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतुन सर्व क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमाता स्वतंत्र केली ती काय पुन्हा तुमची गुलाम करायची म्हणून?

अधिक वाचा  मी राम नव्हे, दशरथाच्या मार्गावर…; 2 लग्न, एका अफेयरवर कमल हासन स्पष्टीकरण देत म्हणाले, ‘मी देवाला मानत नाही’

आज हा वडिलांसारखा, उद्या दुसरे कोणी… लाजलज्जा तरी ठेव. हे वैचारिक वांझोटेपणच लक्षण. स्वत:मध्ये कर्तृत्वाची झलक नाही, दुसर्‍याच चोरायचं.

माझ आवाहन आहे, नुसत मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मत मागुन दाखवा. शिवसेना आणि बाळासाहेबांच्या नावाशिवाय लढुन दाखवा. आमच धनुष्यबाण चोरलंय. आता लक्षात ठेवा, जो जो धनुष्यबाण हातात घेऊन समोर येईल तो चोर. चोराला मत देणार का? चोरांना आवाहन देतोय, एक थेंब जरी मर्दुमकी शिल्लक असेल तर, तुम्हीं चोरलेल धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो. होऊन जाऊ दे. महाराष्ट्र करेल तो फैसला मला मान्य आहे. पण सत्तेचे गुलाम निवडणूक आयोग मला घरी जा सांगतिल तर मी त्यांना घरी पाठविन.

ही लढाई….आज आणि आत्ताच २०२४ तर २०२४ स्वातंत्र्यलढ्याशी सुतराम संबंध नसलेली पाशवी वृत्ती जर माझा देश गिळंकृत करत असेल तर तिला इथल्या इथेच गाडाव लागेल. अशी काही हुकुमशाही सुरू होईल की तुम्हांला डोक वर काढुन बघता येणार नाही. म्हणून करायच असेल तर आत्ताच. जर शपथ घेणारच असाल तर हीच शपथ घ्यायची, मी माझ्या भारतमातेला पुन्हा यांच्या गुलामगिरीत अडकु देणार नाही. जर अस केल नाही तर २०२४ ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल. तुम्हाला मतदानाचा अधिकार राहणार नाही.