शाहजहापूर येथे पोलिसांच्या बैठकीतच मौलानाकडून ‘होळी खेळण्यास बाध्य केल्यास दंगल होईल’, अशी धमकी !
पोलिसांकडून मौलानाच्या विरोधात गुन्हा नोंद : मौलानाची क्षमायाचना !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) –
होळीच्या पार्श्‍वभूमीवर शाहजहापूर येथील ६७ मशिदींना कापडांनी झाकण्यात येत आहे.
संभल येथे ८ मशिदी झाकण्यात आल्या आहेत. मुरादाबाद येथे होळीच्या पूर्वी पोलिसांच्या शांतता बैठकी
त मौलाना सदाकत हुसैन याने दंगलीची धमकी दिली. या संदर्भातील व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर मुरादाबाद
पोलिसांनी ट्वीट करून मौलाना हुसेनच्या विरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती दिली, तर मौलानाने क्षमा मागितली आहे
. ‘सणावर विधान करून कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता’, असे मौलानाने म्हटले आहे.
होळीच्या वेळी मशिदींवर रंग उडाल्यास निर्माण होणार्‍या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर मशिदींना झाकण्यात येत आहेत,
तर दुसरीकडे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी शांतता बैठका घेत आहेत.

अधिक वाचा  बीड जिल्हा रुग्णालयात भयंकर परिस्थिती, प्रसुतीवेळी तीन महिलांचा मृत्यू, डॉक्टरांना वाचवण्यासाठी राजकीय धडपड?