मुंबई : महाविकास आघाडी सरकराच्या काळातल्या घोटाळ्यांची मी माहिती घेतली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार होतो, त्यामुळेच माझ्यावर हल्ला झाल्याचा ठपका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठेवला आहे.काल शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान संदीप देशपांडे यांच्यावर दोन अज्ञातांनी हल्ला केला होता. पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरोधा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणाते दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे.

आज संदीप देशपांडे यांनी संदर्भात पत्रकार परिषद घेतली. हे प्रकरण तपासाधीन असल्याने मी कुणाबद्दलही बोलणार नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले. त्यांनी कोविड काळात झालेल्या घोटाळ्याचा संदर्भ दिली. मी दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन कोविड काळातील घोटाळा उजेडात आणणार होतो. दोन संस्था अशा आहेत ज्यांचा कोरोनापूर्वी दहा लाखांचा टर्नओव्हर होता. कोविडनंतर त्यांनी करोडोंचा घोटाळा केल्याचं संदीप देशपांडेंनी सांगितलं.

अधिक वाचा  अखेर भाजप- काँग्रेसची युती झालीच; पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याने इतिहासच रचला

देशपांडे पुढे म्हणाले की, मी यांचे घोटाळे बाहेर काढणारच आहे. तक्रारीही दिल्या आहेत. कालच्या हल्लेखोरांनी माझ्या हातापायावर मारण्याऐवजी थोबाडावर मारायला पाहिजे होतं, कारण मी घोटाळ्यांवर बोलत. परंतु मी बोलत राहणार आणि घोटाळे बाहेर काढणार, असं संदीप देशपांडे म्हणाले आहे