कर्नाटकातील भाजप आमदाराच्या मुलाला 40 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. आमदार माडळ विरूपाक्ष यांच्या मुलाला लोकायुक्तांच्या पथकाने लाच घेताना पकडलं आहे. विरूपाक्ष यांच्या घरातून अधिकाऱ्यांनी 2 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जप्त केली आहे.

प्रशांत माडळ सरकारी अधिकारी असून ते बंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण बोर्डाचे लेखापाल आहेत. प्रशांत यांनी कच्चा माल खरेदीचे कंत्राट देण्याच्या बदल्यात 81 लाख रुपयांची लाच मागितली होती. यातला पहिला हफ्ता स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. ही रक्कम अनेक थैल्यांमध्ये भरून आणण्यात आली होती. लोकायुक्तांकडे लाच मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्यानंतर लोकायुक्त कार्यालयाने छापेमारी करत प्रशांत यांना रंगेहाथ पकडलं होतं. लोकायुक्तांनी या लाचखोरीच्या प्रकरणात आमदार माडळ आणि त्यांचा मुलगा प्रशांत या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा  पंजाबसाठी विजयानंतर गूड न्यूज, आरसीबीला तिसऱ्या पराभवानंतर मोठा झटका

विरूपाक्ष यांचा मुलगा प्रशांत माडळ याला लाच घेताना पकडल्यानंतर भाजप आमदाराच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी घरातून 2 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम सापडल्याने लोकायुक्त आमदार विरूपाक्ष यांनाही चौकशीसाठी बोलावणार असल्याचे कळते आहे.

40 लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेव्यतिरिक्त प्रशांज माडळ यांच्या कार्यालयातून 1.7 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. माडळ विरूपाक्ष हे कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट कंपनीचे चेअरमन आहेत. त्यांच्यासाठी प्रशांत हा कलेक्शन एजंट म्हणजेच लाच स्वीकारण्याचे काम करत होता असं सांगितलं जात आहे. या पैशांच्या स्त्रोत काय आहे हे तपासण्याचे काम सध्या सुरू आहे.

अधिक वाचा  माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या मुलींना योग्य घर मिळेना; म्हणाले…. ‘सवलत नव्हे, तर हक्क म्हणून सुविधा द्या!’