ईशान्य भारतातील तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून, यात त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपने सत्ता टिकवून ठेवली आहे.

मात्र मेघालयात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. मेघालयात सर्वाधिक 24 जागा जिंकत नॅशनल पीपल्स पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मेघालयात तृणमूल काँगे्रसने खाते खोलत 5 जागांवर विजय संपादन केला आहे. तर काँगे्रसला 5 आणि भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत.
त्रिपुरामध्ये भाजपने 60 जागापैकी 32 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली असून, काँगे्रसला केवळ 3 तर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर, त्रिपुरा मोठा पार्टीने 13 जागेवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे नागालँडमध्ये भाजपचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीची युती होती. यात भाजपने 12 तर नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीने 25 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे.

अधिक वाचा  ‘मुंडे साहेबांचे नाव लहान होऊ देणार नाही जरी नाव मोठे करण्याची…’ पंकजा मुंडे भगवान गडावर काय म्हणाल्या?

दरम्यान, गेल्या निवडणुकीत केवळ 1 टक्का मतदान घेणार्‍या राष्ट्रवादी काँगे्रसने यंदा नागालँडमध्ये 6 जागा जिंकल्या आहेत. नागालँडमध्ये राष्ट्रवादीची सुसाट कामगिरी सुरू आहे. त्यामुळे नागालँडची निवडणूक राष्ट्रवादीसाठी ऐतिहासिक ठरली आहे. येथे सहा जागांवर राष्ट्रवादीचा मुकाबला थेट भाजपशी झाला. या सहाही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे मेघालयात सत्तेचा दावा करणारा केंद्रातील सत्ताधारी भाजप इथे तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अनपेक्षितरित्या मुंसडी मारत दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे इथे सत्तेत सहभागी होण्याचा भाजपचा प्रयत्न फसण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंतच्या निकालानुसार संगमा यांच्या एनपीपी पक्षाला सर्वाधिक 24 जागा मिळाल्या आहेत. भाजपला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत.

अधिक वाचा  पाण्यात काठी मारल्याने पाणी तुटत नाही, राज-उद्धव भाऊ भाऊ, कुटुंब म्हणून एकत्र यावं, पण.. : सुषमा अंधारे

आठवलेंच्या पक्षाचा नागालँडमध्ये डंका – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षाचे दोन उमेदवार नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. महाराष्ट्रात एकही आमदार नसणार्‍या आठवले गटाचे थेट नागालँडमध्ये आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे सगळीकडे याची चर्चा सुरु झाली आहे. नागालँड विधासभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आठ उमेदवार उभे केले होते. त्यातील दोघांचा विजय झाला आहे. ‘ऊस शेतकरी’ या निशाणीवर रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.

नागालँडला 60 वर्षानंतर मिळाल्या महिला आमदार – नागालँडमध्ये लोकांनी इतिहास रचला आहे. येथे प्रथमच महिला आमदार निवडून आल्या. तब्बल 60 वर्षांनंतर राज्याला महिला आमदार मिळाल्या आहेत. हेकानी जाखलू असे या महिले आमदाराचे नाव आहे. हेकानी जाखलू या भाजपचा मित्रपक्ष एनडीपीपी पक्षाच्या उमेदवार आहेत. त्या दिमापूर-3 मधून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. त्यांनी लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) उमेदवार इजेटो झिमोमी यांचा पराभव केला. मात्र, यावेळी नागालँडला आणखी एक महिला आमदार मिळू शकतात, असे मानले जात आहे.

अधिक वाचा  श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना नानाकडेच पण ‘ब’ वर्गाकडे विशेष लक्ष; बदललेली गणिते तारेवरची कसरत?