मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

दरम्यान, याच मालिकेतील मुख्य पात्र जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांच्याविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘दिलीप यांच्या घराबाहेर 25 लोक बंदूक, हत्यारं आणि बॉम्ब घेऊन उभे आहेत’, असं एका अज्ञात व्यक्तीने फोन करून नागपूर कंट्रोल रुमला सांगितलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा  ग्रामदैवत म्हातोबाच्या मूळ ठिकाण पायवाट सुकर; ना. चंद्रकांतदादा पाटलांच्या पुढाकाराने पायऱ्यांची पुनर्बांधणी

मिळालेल्या माहितीनुसार, ‘1 फेब्रुवारी रोजी ‘कटके’ असं नाव सांगत एका व्यक्तीने नागपूर कंट्रोल रुमने कॉल केला होता. त्या व्यक्तीने फोनवर सांगितलं की… ‘तारक मेहता….’ मालिकेत जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्या घराबाहेर शिवाजी पार्कात 25 लोक बंदूक आणि बॉम्ब घेऊन उभे आहेत’.

दरम्यान, ही माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला अलर्ट केलं आणि एफआयआर दाखल करण्यास सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी आपला पुढील तपास देखील सुरु केला असून, फोन करणारा हा मुलगा दिल्लीच्या एका सिम कार्ड कंपनीत काम करतो. मात्र त्या व्यक्तीचा यात कोणताही सहभाग नसून, त्या मुलाच्या नंबरचा वापर त्याच्या माहितीशिवाय स्पूफ करून एका ॲपद्वारे कॉल करण्यात आला होता.’ असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

अधिक वाचा  दहशतवाद्यांनी हल्ला कॅमेऱ्यात केला रेकॉर्ड; AK-47 मधून सतत गोळ्यांचा वर्षाव मृत्यू झालेल्यांची संपूर्ण यादीच आली समोर