भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला झालेली दुखापत हा चिंतेचा विषय ठरला आहे. तंदुरुस्त नसल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकल्यानंतर बुमराह यंदाच्या आयपीएललाही मुकणार आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून बाहेर असलेल्या बुमराह दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बुमराह जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपसाठी तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र तो आयपीएलला मुकणार असल्याने मुंबई इंडियन्सने त्याचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.

जयप्रीत बुमराह हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी नेहमीच हुकूमाचा एक्का ठरत आला आहे. मात्र यावेळी तो अनफिट असल्याने मुंबईचं टेन्शन वाढलेलं आहे. आता बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सकडून त्याचा पर्याय शोधण्यास सुरुवात झाली आहे. त्यात तीन वेगवान गोलंदाजांची नावं समोर येत आहेत. हे गोलंदाज पुढीलप्रमाणे.

अधिक वाचा  पुणे तिथे काय उणे! प्लास्टिकची बंदूक दाखवून २५- ३० तोळे लुटून आरोपी फरार; मालकही बघत राहिला

१) संदीप शर्मा – आयपीएलमध्ये संदीप शर्माने अनेकदा अविस्मरणीय कामगिरी केली आहे. त्याची गणना अव्वल खेळाडूंमध्ये होत नसली तरी त्याने १०४ सामन्यांमध्ये २६.३३ च्या सरासरीने ११४ विकेट्स टिपले आहेत. संदीप शर्माकडे सुरुवातीच्या षटकांमध्ये चेंडूला दोन्हीकडे स्विंग करण्याची क्षमता आहे. मात्र त्याला जसप्रीत बुमराहप्रमाणे सातत्य राखता आलेले नाही. तरीही बुमराहला पर्याय म्हणून मुंबईचा संघ संघात समाविष्ट करू शकतो.

२) धवल कुलकर्णी – डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता. तसेच तो आयपीएलमध्ये राजस्थान आणि गुजरात लॉयन्सकडूनही खेळला आहे. ३४ वर्षीय धवल कुलकर्णीचा आयपीएलमधील रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने ९२ सामन्यात २८.७७ च्या सरासरीने ८६ विकेट्स टिपल्या आहेत.

अधिक वाचा  लाडकी बहीण योजनेत आठ लाख महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार

३) अर्जन नागवासवाला – वरील दोन्ही खेळाडूंव्यक्तिरीक्त मुंबई इंडियन्सकडून युवा वेगवान गोलंदाज अर्जन नागवासवाला यालाही संधी देण्याचा विचार होऊ शकतो. अर्जन नागवासवाला याने आतापर्यंत आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सातत्यपूर्ण कामगिरी करत विकेट्स मिळवत आहे. बुमराहला पर्यायम्हणून मुंबई इंडियन्सकडून या खेळाडूच्या नावाचाही विचार होऊ शकतो. २५ वर्षीय अर्जन नागावासवाला याने मुश्ताक अली करंडक स्पर्धेमध्ये २५ सामन्यात १६.६२ च्या सरासरीने ३५ विकेट्स घेतल्या आहेत.