पुणेः कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या दोन्ही निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. धंगेकर हे मतमोजणी केंद्रावर पोहोचले. त्यापूर्वी त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे येथे दुचाकीवर पोहोचले. कसबा पेठ निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये लढत झाली. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी झाली. यामध्ये रवींद्र धंगेकर यांना आघाडी मिळाली आहे. दरम्यान, आज सकाळी धंगेकर यांच्या पत्नीने त्यांचं औक्षण केलं. त्यानंतर ते मतमोजणी केंद्रावर पोहोचले. त्यापूर्वी त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी भावना व्यक्त केल्या.

अधिक वाचा  ‘फुले’ हिंदी चित्रपट ट्रेलर पाहून अंदाज लावू नका, चित्रपट पाहा”, ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांची प्रतिक्रिया

धंगेकर नेहमी दुचाकीवर प्रास करतात. ते कधीही चारचाकीमध्ये दिसत नाही. या मुद्द्यावर बोलतांना ते म्हणाले की, माझा विजय होणार, हे निश्चित आहे. हा जनतेचा विजय ठरणार आहे. मी दुचाकीवर बसत नाही आणि सिनेमाही बघत नाही. मी आजपर्यंत चित्रपटगृहात गेलेलो नाही. अनेक मित्र सिनेमाची तिकीटं आणून देतात पण मी जात नाही. कारण मला जनतेची सेवा करायची आहे. निवडणुका येत-जात असतात मी मात्र कायम जनतेची सेवा करत राहणार. रासनेंचा कारभार चांगला नव्हता, त्यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचं धंगेकर यांनी सांगितलं.