मुंबई : महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या लावणी वर अनेकजण फिदा आहेत.तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. पण तुम्हाला गौतमी पाटील कोण आहे? कुठची आहे? माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला गौतमीबद्दल सांगणार आहोत.एका मुलाखती दरम्यान स्वत: गौतमीने तिचा आजवरचा प्रवास कसा झाला याबद्दल आहे. धुळ्यामधील शिंदखेडा गावात गौतमी पाटीलचा जन्म झाला. गौतमीचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी तिच्या वडिलांनी आईला सोडून दिलं. त्यामुळे ती आपल्या आजोळीच शिंदखेडा येथे लहानाची मोठी झाली.पोटा-पाण्यासाठी गौतमी आठवीला असताना तिचं कुटुंब पुण्यात आलं. दरम्यान आई छोटी-मोठी कामं करूनच ती घर चालवायची. या काळात गौतमीच्या आईचा अपघात झाला. यानंतर तिला कामावर जाणं शक्य नव्हतं. आणि यामुळेच गौतमीवर घराची जबाबदारी पडली. आणि पुढे तिने लावणीमध्ये करिअर करायचं ठरवलं.

अधिक वाचा  ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे प्रवाशांचे हाल! 144 ट्रेन रद्द

 

गौतमी सुरुवातीपासून पुण्यातील विश्व कला नृत्य अकादमी येथे नृत्याचं प्रशिक्षण घेत होती. त्यामुळे नृत्य क्षेत्रातच काम करून पुढचं करिअर करण्याचे तिने प्रयत्न सुरू केले. आठवीला असताना गौतमीने वडिलांना पहिल्यांदा पाहिलं.पुण्यात स्थायिक झाल्यानंतर वडिलांना परत घरी आणण्याचा प्रयत्न तिने केला. पण दारुचं व्यसन, आईला मारहाण करणं सुरुच राहिल्याने वडिलांपासून पुन्हा दूर ठेवल्याचं ती सांगते. आपले शिक्षण खूपच कमी असल्याचंही ती म्हणाली.दरम्यान अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी सादर केली. तिथे तिला पाचशे रुपये मानधन मिळालं होतं. लावणी क्षेत्रात पूर्वी आपल्या संपर्कातील कुणीच नव्हतं. सुरुवातीच्या काळात बॅक डान्सर म्हणून काम केलं. नंतर पुढे आघाडीची लावणी कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळत गेली.सुरुवातीला महेंद्र बनसोडे यांनी गौतमीला अकलूज लावणी महोत्सवात पहिल्यांदा बॅक डान्सर म्हणून नृत्याची संधी दिली.

अधिक वाचा  इंडिया आघाडीच्या बैठकीआधी मोठा झटका, नेमक्या पडद्यामागे हालचाली काय? ‘धोबीपछाड’ नेताच गायब

 

पुढे संपर्क वाढत जाऊन नृत्याच्या विविध सुपाऱ्या तिला मिळत गेल्या. यानंतर सोशल मीडियावरही तिचे व्हीडिओ व्हायरल होऊ लागले. सध्याच्या घडीला गौतमी पाटीलचे इन्स्टाग्रामवर 3 लाख 40 हजारांवर फॉलोअर्स आहेत.पुण्यातील एका स्टेजशो दरम्यान कपडे बदलताना गौतमीचे अश्लिल व्हिडीओ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असताना गौतमी पाटीलची लोकप्रियता वाढता असताना तिला बदनाम करण्यासाठी हा घृणास्पद प्रकार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला गौतमी पाटीलकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.