महाराष्ट्राच्या २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी ‘पॉईंट ऑफ प्रोसिजर’च्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकी देत असल्याचा आरोप केला. ते २७ फेब्रुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते.

विधानसभेत नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव यांनी माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही असा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. तसेच काय चाललं आहे असा प्रश्न विचारला. यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. ते म्हणाले, “भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरू झाली आहे का? अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही.”

अधिक वाचा  ‘स्थानिक’च्या निवडणुका लांबल्या ‘या’ पदासाठी जोरदार लावली फिल्डिंग; 2025-26 चे 1200 कोटींचे अंदाजपत्रक

“हे योग्य नाही. सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडा, मात्र, भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत. हे कसं चालेल,” असं फडणवीस यांनी म्हटलं.