केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक निवडणूक केंद्रावर सदर निवडणुकीमध्ये उभे असणान्या सर्व उमेदवारांची माहिती जसे की वय, शिक्षण, मालमत्ता, दाखल फौजदारी दिवाणी गुन्हे, गुन्ह्यासाठी झालेली शिक्षा इत्यादी ही माहिती सामान्य मतदारांना मतदानाच्या अगोदर समजेल व त्यानुसार मतदार आपले मत कोणाला द्यायचे याचा निर्णय घेऊ शकतील. अशी माहिती प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. परंतु 215 कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक 2023 मध्ये मतदान केंद्रांची पाहणी केल्यानंतर, बहुतेक सर्वच मतदान केंद्रावर या नियमाची अंमलबजावणी केली नसल्याचे आम्हाला आढळून आले आहे. याबाबत संबंधित केंद्र प्रमुख यांचेकडे सचिन दत्तात्रय धनकुडे विचारणा केली असता, असे काही साहित्य आम्हाला दिले नसल्याने, आम्ही ते वापरले नाही असे संबंधित केंद प्रमुख यांनी आम्हाला सांगितले.
आपल्याकडुन मतदारांपर्यंत सर्व उमेदवारांची माहिती पोहोचु नये, यास्तव असे माहिती फलक लावण्याचे टाळले असल्याचे आमचे मत झाले आहे. सदर प्रकरणी आपल्याकडून हलगर्जीपणा केल्याचे कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप सचिन दत्तात्रय धनकुडे यांनी लेखी तक्रारीतून केली आहे.