जगभरातल्या श्रीमंतांच्या यादीतून भारतीय उद्योगपती गौतम अदाणी यांची वरचेवर घसरण होत आहे. आज श्रीमंतांच्या यादीमध्ये गौतम अदाणी तिसाव्या स्थानावर घसरले आहेत.
अमेरिकेची संशोधन संस्था हिंडनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर गौतम अदाणींच्या मागे शुक्लकाष्ठ लागलं आहे. दररोज एकामागून एक संकटं अदाणींवर कोसळत आहेत. चालू वर्ष त्यांच्यासाठी खूपच अडचणीचं ठरणार असल्याचं दिसून येत आहे.

जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले अदाणी २४ जानेवारीच्या अहवालानंतर दहाव्या स्थानावर घसरले, त्यानंतर विसाव्या आणि आज ते थेट तिसाव्या स्थानी गेले आहेत. २०२२ मध्ये अदाणींनी जेवढं कमावलं होतं ते एका महिन्यात गमवावं लागलं आहे.
अदाणींच्या नेटवर्थमध्ये घसरण होत असल्याने जगभारतील श्रीमंतांमध्ये त्यांचा दबदबा कमी होत चालला आहे. मागच्या वर्षी २०२२ मध्ये झटपट कमाई करत अदाणी जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले होते. मात्र वर्षाअखेरीस चौथ्या स्थानापर्यंत खाली आले होते.

अधिक वाचा  “शिंदे तेव्हा मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते”, ठाकरेंनी बाण डागताच, शिंदेंनीही केला पलटवार, मी डॉक्टर नसलो तरी मोठं ऑपरेशन केलंय!