पुणेः कसबा पेठ निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महत्वाचे नेते कसब्यामध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. काही वेळापूर्वी कसब्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आसूड ओढला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपचा कार्यकर्ता कसा असतो हे गिरीश बापट यांच्याकडे बघून लक्षात येईल. आजारी असतांनासुद्धा त्यांनी पक्षासाठी बैठक घेतली. त्यांच्या आवाहनावर आता आपल्याला ही निडणूक जिंकायची आहे.

विरोधकांनी या निवडणुकीमध्ये अनेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला परंतु कसब्यातला मतदार हा हिंदुत्ववादी विचारांचा आहे. छत्रपती शिवरायांच्या पुण्यामध्ये देशभक्तांचा मेळा पहायला मिळतोय, असं फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा  औरंगजेबाची कबर छ. संभाजीनगरमध्ये मग नागपूर अचानक का पेटलं? धार्मिक संदेश लिहिलेले कापड जाळले…….

पवारांच्या बैठकीमध्ये जातीयवादी टिपण्णी- फडणवीस

शरद पवार यांनी काल बैठक घेतली. त्यांच्या बैठकीमध्ये एक नेता म्हणतो, मोदींना आणि आरएसएसला हरवण्याकरीता देशभरातील मुसलमान आणू, मेलेला मुसलमानही येईल, असं जातीयवादी विधान पवारांच्या बैठकीत झाल्याचं फडणवीस म्हणाले. काँग्रेसचा उमेदवार निवडून येणारच नाही. पण जर तो उमेदवार निवडून आला तर पुण्यश्वर महादेवाबद्दल त्यांची भूमिका काय असेल? हे स्पष्ट करावं, असं आवाहन फडणवीसांनी केलं.