मुंबई: पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु आहे. या दोन्ही मतदारसंघात आपला उमेदवार निवडणून यावा, यासाठी पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यात आता उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रचार केला. उद्धव ठाकरे पोटनिवडणूक प्रचारासाठी ऑनलाईन पद्धतीने जनतेला संबोधित केलं. या ऑनलाईन प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.कसबापेठ आणि पिंपरीमध्ये मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी जगताप आणि टिळक यांना श्रद्धांजली ही व्हायली.तसेच भाजप खासदार यांना आजारी असतानाही प्रचारासाठी आणल्याच्या मुद्द्यावरुन सडकून टीका केली.

अधिक वाचा  औरंगजेबाची कबर छ. संभाजीनगरमध्ये मग नागपूर अचानक का पेटलं? धार्मिक संदेश लिहिलेले कापड जाळले…….

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“आपली लढाई सुरु झालीय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ. लढाई लढण्यासाठी मला जनतेची साथ आहे”, असा विश्वास ठाकरे यांनी बोलून दाखवला. “गंभीररित्या आजारी असलेल्या गिरीश बापट यांना प्रचारासाठी आणनं हे दुर्देवी आहे. बापट आजारी असताना त्यांना प्रचारासाठी उतरवणं ही अमानुष वृत्ती आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

भाजप खासदार गिरीश बापट हे कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी थेट व्हिलचेअरवर बसून प्रचाराच्या मैदानात उतरले होते. बापट यांनी प्रचार करण्यास नकार दिला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली होती. यानंतर बापट यांनी होकार दिला.

अधिक वाचा  ”एक लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या दहा योजना सुरु करता येतील”, शिंदे गटाच्या नेत्याचं विधान चर्चेत!

तसेच कसब्यात नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गिरीश बापट यांनी व्हिलचेअरवर एन्ट्री मारली. यावेळी गिरीश बापट यांची प्रकृती प्रचंड ढासळलेली दिसली. त्यांच्या बोटांमध्ये ऑक्सीमीटर होतं. तसेच ऑक्सिजनचा सिलेंडरदेखील होता.

या मुद्द्याला हात घालत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. बापट आजारी असताना त्यांना प्रचारासाठी उतरवणं ही अमानुष वृत्ती असल्याचं ठाकरे म्हणाले.

टिळक कुटुंबियांना भाजपने वापरुन फेकलं, असा आरोप ठाकरे यांनी केला. तसेच टिळकांच्या कुटुंबियांना भाजपने उमेदवारी का नाकारली, असा सवालही उद्धव यांनी या निमित्ताने उपस्थित केला.

“आपलं नाव आणि चिन्ह चोरलं. याला लोकशाही म्हणायचं का”,असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.

अधिक वाचा  विधान परिषद पोटनिवडणुकीत एक अर्ज बाद, आमदारकीचे स्वप्न भंगले आज (18 मार्च) दुपारी 12 वाजता या अर्जांची छाननी पार

शिंदे यांच्या शिवसेनेला ओपन चॅलेंज
तसेच उद्धव ठाकरे यांनी या ऑनलाईन प्रचारात शिंदे यांच्या शिवसेनेला चँलेज दिलं. चोरलेलं धनु्ष्यबाण तुम्ही घेऊन या, आम्ही मशाल घेऊन येतो, अशा शब्दात ठाकरे यांनी हे आव्हान दिलं.

“तसेच आमच्यासोबत राहिले तर तांदळातले खडे आणि तुमच्यासोबत गेले तर तर धुतल्या तांदळासारखे”, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.