पुणे : राज्यात सन २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधी वरुन सध्या राज्यात बरीच राजकीय धुरळा उडतो आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी नुकतचं यावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. पवारांच्या या विधानावर आता शिवसेनेच्या शिंदे गटानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना शरद पवारांच्या विधनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हस्के म्हणाले, “शरद पवार हे फार मोठे आहेत, मी त्यांच्याविषयी बोलू नये”
सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार
ज्या ठिकाणी संजय राऊत यांनी जबाब नोंदवलेला आहे. त्या त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा पण जबाब नोंदवावा. ठाकरे गटाची मागणी सुप्रीम कोर्टात आज मान्य झाली नाही, यामुळं आज आमचा विजय झाला आहे. दोन आठवड्यानंतर निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात म्हणणं मांडणार आहे, आम्हीही आमचं मत मांडणार आहोत, असंही मस्के यावेळी म्हणाले.
शिवसेना-भाजप युती तयार
महापालिकेच्या निवडणुका आम्ही थांबवल्या नाहीत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेची मुदत संपली आहे, पण हा विषय कोर्टात आहे. उद्या जरी निवडणुका लागल्या तरी शिवसेना भाजप युती तयार आहे, अशा शब्दांत शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं नरेश मस्के यांनी स्पष्ट केलं.