पनवेल : प्रकल्प येतात प्रकल्प जातात पण त्याचे दूरगामी परिणाम हे तेथील भूमिपुत्रांना भोगावे लागतात हे आजवरच्या अनुभवातून समोर आलेले शाश्वत सत्य नाकारता येत नाही, प्रकल्पांच्या बदल्यात शेतकरी व जमीन मालकांना मिळालेली नोकरी, भरपाई, पुनर्वसन ही आश्वासने खरेच पूर्ण होतील की ती कागदोपत्रीच राहून शेवटी ती रद्दीत फेकली जातील हा यक्षप्रश्न नेहमीच भेडसावत राहील, अश्याच प्रकारची अवस्था सध्या उरण व पनवेल तालुक्यात प्रकर्षाने जाणवत आहे.
सिडकोच्या Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA – नैना) या प्रकल्पाच्या पोटी जन्माला आलेल्या नैनाला सध्या स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांकडून कडाडीचा विरोध करण्यात येत आहे व नैना विरोधात रोज एक गाव बंद या पार्श्वभूमीवर दि. २२ रोजी पनवेल येथील विचुंबे-देवद गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
सदर बंद हा शेतकरी व भूमिपुत्रांच्या हिताचा असल्याने समाजातील सर्वच स्तरातील लोकांनी व राजकीय पक्षांनी सदर बंदास भरघोस प्रतिसाद देत एक दिवसीय बंद शासकीय नियमांचे पालन करीत शांततेच्या मार्गाने पार पाडला.
आजवर अनेक प्रकल्प आले ज्यात हजारो हेक्टर जमिनी साम, दाम, दंड, भेद नीती वापरून अधिग्रहण करण्यात आल्या त्यापैकी काही जमिनींवर प्रकल्प उभे राहिले तर काही जमिनी तश्याच पडीक राहिल्या व दिलेली आश्वासनांच्या मागे प्रकल्पग्रस्त शिक्का माथ्यावर देऊन भूमिपुत्र वाऱ्यावर सोडला गेला, नैनाच्या माध्यमातून तालुक्यात पायाभूत सुविधा निर्माण होतील असे प्रतिपादन सिडको करीत असली तरी त्याकरता जवळपास दीडशेहुन अधिक गावांची जमीन ताब्यात घेण्याचा सिडकोचा मानस आहे, नैना अंतर्गत ६०% जमीन परत करू व उर्वरित जमिनीवर पायाभूत सुविधा उभारू अस जरी सिडकोचे म्हणणे असली तरी आधीची उदाहरणे बघता आम्ही कोणत्या आधारांवर जमिनी द्यायच्या ? असा सवाल शेतकरी करीत आहेत म्हणून शेतकरी विरुद्ध सिडको हा संघर्ष पराकोटीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नैना विरोधात देवद-विचुंबे गावात एक दिवसीय बंद यशस्वीपणे पार पडला
पनवेल दि. २२ (प्रवीण रा. रसाळ) प्रकल्प येतात प्रकल्प जातात पण त्याचे दूरगामी परिणाम हे तेथील भूमिपुत्रांना भोगावे लागतात हे आजवरच्या अनुभवातून समोर आलेले शाश्वत सत्य नाकारता येत नाही, प्रकल्पांच्या बदल्यात शेतकरी व जमीन मालकांना मिळालेली नोकरी, भरपाई, पुनर्वसन ही आश्वासने खरेच पूर्ण होतील की ती कागदोपत्रीच राहून शेवटी ती रद्दीत फेकली जातील हा यक्षप्रश्न नेहमीच भेडसावत राहील, अश्याच प्रकारची अवस्था सध्या उरण व पनवेल तालुक्यात प्रकर्षाने जाणवत आहे.
सिडकोच्या Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA – नैना) या प्रकल्पाच्या पोटी जन्माला आलेल्या नैनाला सध्या स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांकडून कडाडीचा विरोध करण्यात येत आहे व नैना विरोधात रोज एक गाव बंद या पार्श्वभूमीवर दि. २२ रोजी पनवेल येथील विचुंबे-देवद गावात माजी आमदार श्री. बाळाराम पाटील साहेब व ऍड. सुरेशजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली कडकडीत बंद पाळण्यात आला.
सदर बंद हा शेतकरी व भूमिपुत्रांच्या हिताचा असल्याने नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेल, ९५ गाव नवी मुंबई नैना व इतर प्रकल्पग्रस्त समिती पनवेल, स्थानिक शेतकरी नैना प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था देवद-विचुंबे, क्रांतिकारी सेवा संघ, महाराष्ट्र राज्य, पनवेल तसेच सर्व नैना प्रकल्प विरोधी संघटना व समित्या त्यांचे पदाधिकारी व समाजातील सर्वच स्तरातील लोकांनी व राजकीय पक्षांनी सदर बंदास भरघोस प्रतिसाद देत एक दिवसीय बंद शासकीय नियमांचे पालन करीत शांततेच्या मार्गाने पार पाडला.
आजवर अनेक प्रकल्प आले ज्यात हजारो हेक्टर जमिनी साम, दाम, दंड, भेद नीती वापरून अधिग्रहण करण्यात आल्या त्यापैकी काही जमिनींवर प्रकल्प उभे राहिले तर काही जमिनी तश्याच पडीक राहिल्या व दिलेली आश्वासनांच्या मागे प्रकल्पग्रस्त शिक्का माथ्यावर घेऊन भूमिपुत्र वाऱ्यावर सोडला गेला, नैनाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करू असे जरी सिडको सांगत असली तरी त्याकरता जवळपास दीडशेहुन अधिक गावांची जमीन ताब्यात घेण्याचा मानस आहे, नैना अंतर्गत ६०% जमीन परत करू व उर्वरित जमिनीवर पायाभूत सुविधा उभारू अस जरी सिडको म्हणत असली तरी आधीची उदाहरणे बघता आम्ही कोणत्या आधारांवर जमिनी द्यायच्या ? असा सवाल शेतकरी करीत आहेत म्हणून शेतकरी सिडको हा पराकोटीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.