शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आता मुंबईतील शिवसेना भवन आणि पक्षाच्या शाखांवर देखील एकनाथ शिंदे दावा करणार असल्याच्या अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आज विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाच्या शिवसेनेने घेतल्यानंतर शिवसेना भवन देखील घेणार असल्याच्या चर्चांना आता पुर्ण विराम मिळाला आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, आम्ही कोणाच्याही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही आम्हाला त्याची गरज नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत आहोत. त्याच्या कोणत्याही मालमत्तेवर आमचा दावा नाही.आम्हाला बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे त्यामुळे आम्हाला काहीही नको, तुम्हाला कोणीही काहीही सांगितल तरी विश्वास ठेवू नका.

अधिक वाचा  इंजमाम उल हक आणि सकलैन मुश्ताक तर ‘हिंदू’! स्वतः सांगितले भारतात कुठे राहत होते पूर्वज, कपिल शर्मासोबत असे आहे खास कनेक्शन

मी अधिकृत पणे सांगतो कोणत्याही संपत्तीवर आमचा दावा नाही. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.