मुंबई : वाढत्या वयामुळे दिनेश कार्तिकला पुन्हा टीम इंडियात संधी मिळणार नाही. IPL च्या मागच्या सीजनमध्ये त्याने दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले. टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळालं. पण तो विशेष प्रभावी कामगिरी करु शकला नाही. दिनेश कार्तिक आता मैदानाऐवजी कॉमेंट्री बॉक्समध्ये जास्त दिसतो. कॉमेंट्री बॉक्समधून तो एक्सपर्ट ओपिनियन देत असतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये बसत असला, तरी दिनेश कार्तिकच्या बॅटिंगमध्ये अजूनही तोच धाक आहे. अलीकडेच एका स्थानिक टुर्नामेंटमध्ये दिनेश कार्तिकच्या बॅटिंगची दहशत दिसून आली.

दिनेशच्या बॅटिंगमुळे RBI ची टीम हरली

अधिक वाचा  मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीवारी ‘विधान परिषद’ ठरलं?; ‘या’ नावांची चर्चा पण पुन्हा धक्कातंत्रची शक्यता बळावली?

दिनेश कार्तिक मंगळवारी एका टुर्नामेंटमध्ये कमालीची इनिंग खेळला. त्याने 38 चेंडूत नाबाद 75 धावा फटकावल्या. दिनेश कार्तिक डिवाय पाटील ग्रुप बी कडून खेळत होता. कार्तिक 6 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने तुफान इनिंग खेळला. त्याच्या याच इनिंगमुळे टीमची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचली. या मॅचमध्ये RBI चा 25 धावांनी पराभव झाला.

दिनेश कार्तिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कॉमेंट्री करतोय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात तो कॉमेंटेटरच्या रोलमध्ये होता. दुसरी टेस्ट संपल्यानंतर तो पुन्हा मैदानात परतला. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून सुरु होणार आहे. म्हणजे सात ते आठ दिवसांचा वेळ आहे. या दरम्यान कार्तिकने स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडला.

अधिक वाचा  सरकारला औरंगजेबाची कबर काढायची नाही; …..म्हणून त्यांनी घरात दंगल पेटवली, जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर बोचरा वार

आरसीबीसाठी खुशखबर

दिनेश कार्तिकने डिवाय पाटील टुर्नामेंटमध्ये धावा बनवल्या. ही आरसीबीसाठी चांगली बातमी आहे. 31 मार्चपासून आयपीएलची सुरुवात होतेय. कार्तिकचा फॉर्म आरसीबीच्या उपयोगाला येईल. दिनेश कार्तिकने आयपीएल 2022 मध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यानंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळालं. टी 20 वर्ल्ड कपमध्ये प्रभावी कामगिरी केली नाही. वाढत वय लक्षात घेऊन त्याला नंतर टीममधून ड्रॉप करण्यात आलं.