शिवसेनेची भविष्यात वाटचाल योग्यपणे होण्यासाठी तीन जणांची शिस्तभंग समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे अध्यक्ष दादा भुसे असतील. तर मंत्री शंभुराज देसाई आणि संजय मोरे हे सदस्य असतील. त्याअंतर्गत पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई निश्चित केली जाईल. तसेच पक्षाच्या विरोधामध्ये काही लोकांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर शिस्तभंग होईल का, याची छाननी ही समिती करणार आहे. याबाबत माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर उदय सामंत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचार पुढे घेऊन जात असताना शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याची आठवण करून दिली.

अधिक वाचा  ४५ हजार ८९१ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प; गतवर्षीपेक्षा महसुली तूट दुपटीहून जास्त वाढली

त्यानंतर बैठकीत आठ महिन्यातील कामांचा आढवा घेण्यात आला. तसेच निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमांचे आमदार, मंत्र्यांनी तंतोतंत पालन करण्याचे सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे सामंत यांनी सांगितले. शिवसेना स्थापन केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटविला. त्यामुळे शिवसेना राज्यात पोहचली. बाळासाहेबांनी कुणाशी युती करायची, कुणाशी नाही, याबाबत स्पष्ट भूमिका घेतली होती. त्याला स्मरून एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. त्यास शिवसेनेचे ४० आमदार, १० अपक्ष आमदार, १३ खासदार यांनी समर्थन दिले. तो विचार जोपसण्यात कुणीही कमी पडता कामा नये, अशी भूमिका मुख्यंमंत्र्यांनी मांडली. त्यास सर्वांनी पाठिंबा दिल्याचेही सामंत यांनी सांगितले.

अधिक वाचा  “संतोष देशमुख ही एका व्यक्तीची नाही, तर नैतिकतेची हत्या मान खाली गेली”; पंकजा मुंडेंनी मांडली सविस्तर भूमिका

महाराष्ट्राच्या विकासाच्या जडणघडणीत पक्षाची वाटचाल कशी असावी, याबाबत चर्चा केल्याचे सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, “पश्चिम रेल्वे चर्चगेटला चिंतमणराव देशमुख यांचे नाव देणे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, त्यासाठी प्रयत्न करणे, राज्यातील तरूण स्पर्धा परीक्षांकडे वळविण्यासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचा ठराव झाल्याचे सामंत यांनी सांगितले.