पुणे महापालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राज असून आगामी शिवजयंतीच्या उत्साहाला न बसता परिसरातील नागरिकांना उत्साहात आनंदामध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी कोथरूड भागातील शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी पाठपुरावा करत कोथरूड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा परिसरातील रंगरंगोटीचे काम पूर्ण केले. पुणे महापालिकेत नगरसेवक असताना पृथ्वीराज सुतार यांनीच या परिसरातील सुशोभीकरण करण्याची कामे केली होती परंतु गेली वर्षभर पुणे महापालिके असलेले प्रशासकीय राज्य यामुळे यंदाचे शिवजयंती दुरावस्था झालेल्या शिवस्मारकावरतीच करण्याची वेळ येण्याची शंका अनेक शिवप्रेमीमध्ये होती. परंतु स्थानिक नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी शिवजयंतीच्या अगोदर परिसरातील सर्व रंगरंगोटी यांनी साफसफाईची कामे करण्याचा संकल्प करत पुणे महापालिका आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून या भागातील साफसफाई आणि रंगरंगतीच्या कामाची मागणी केली आणि प्रशासकीय काळातही पुढे महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी यांचे गांभीर्य लक्षात घेऊन केलेल्या रंगरंगोटीच्या कामामुळे यंदा शिवजयंतीचा उत्साह वाढला.

अधिक वाचा  संतोष देशमुख पत्नीच्या जबाबातून धक्कादायक दावा उघड; हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुख पत्नीला काय बोलले?

याबाबत पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले की सदरील अश्वारूढ पुतळा महापालिकेने बसवलेला पुण्यातील एकमेव अश्वरूढ पुतळा आहे. कोथरूडच्या या शिवस्मारकापाशी हजारो शिवप्रेमी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत असतात तरी शिवजयंती आधी सदरची काही कामे करणे आवश्यक होते. पुतळयाची रंगरंगोटी करणे, विदयुत विषयक, स्वच्छता विषयक अशी कामे त्वरीत करत शिवाजी महाराजांची सेवा करण्याची ही अनोखी संधी मिळाल्याबद्दल आनंद आहेच असे सांगितले. पुणे महापालिकेचे सर्व कर्मचारी यांनीही ही सर्वकामे शिवजयंतीच्या आधी करून दिल्यामुळे पृथ्वीराज शशिकांत सुतार माजी शिवसेना गटनेते पुणे मनपा यांनी आभार मानले.

अधिक वाचा  दिवंगत संतोष देशमुखांच्या पक्क्या घराची वीट रचली, महंतांकडून भूमिपूजन; शिंदेंनी शब्द पाळला