वनाझ शिवशंभो सेवा प्रतिष्ठाण ट्रस्ट कोथरुड आयोजित वनाझ परिवार महाशिवरात्री उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. तीन दिवस झालेल्या या उत्सवाची सांगता महाप्रसादाने झाली. मंदिर आणि परिसरामध्ये केलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेतले. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे परिसराला जत्रेचे रूप आलं होतं.दिनांक १७ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पद्मश्री विजयजी घाटे यांची शिवसेवा सादर करण्यात आली. दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजल्यापासूनच मंदिरामध्ये अभिषेक सुरू झाले होते. सकाळी दहा वाजता आळंदीतील धर्मशाळेतील विद्यार्थ्यांचे पथक व वनाझ भजनी मंडळच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाशिवरात्रीच्या दिवशी ख्यातनाम शास्त्रीय संगीत गायक पंडित शौनक जितेंद्र अभिषेकी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दुपारची महाआरती मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते तर सायंकाळची महाआरती शिवसेनेचे मा.गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या शुभहस्ते पार पडली. रात्री १२ वाजता उद्योजक अनिल खराडे यांच्या शुभहस्ते उसाच्या रसाचा अभिषेक व भस्मारती झाली. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी हभप. ऋषिकेश महाराज चोरगे यांचे काल्याचे किर्तन झाले व त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. कोथरूड मधील सुमारे पाच हजार भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

अधिक वाचा  भारताच्या विजयानंतर शोएब अख्तरचा व्हीडिओ व्हायरल; “…समजण्या पलीकडचं आहे”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे, कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई, माजी नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, जयश्री मारणे, पुष्पाताई कनोजिया तर माजी नगरसेवक श्याम देशपांडे, राजाभाऊ गोरडे, मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, प्रशांत कनोजिया, रोहिदास आप्पा सुतार, मृणाल ववले, छत्रपती पुरस्कार विजेते गणेश सातपुते, उद्योजक महेश सावंत यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी या उत्सवाला आपली उपस्थिती दर्शविली.

वनाझ परिवारातील बालगोपाळांपासून महिला भगिनी तरुण आणि ज्येष्ठांच्या योगदानातून हा महाशिवरात्री उत्सव यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती प्रतिष्ठाणचे कार्याध्यक्ष दिपक कुल यांनी दिली.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीस यांनी घेतली PM मोदी यांची भेट, ‘या’ तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा