माझे नाव आणि चिन्ह चोरले आहे. पण हा पूर्वनियोजीत कट होता. यापुढेही हे असंच सुरू राहीलं तर आगामी लोकसभा निवडणूक ही शेवटची असेल. त्यानंतर देशात हुकूमशाहीला सुरवात होईल. देशात हुकुमशाहीचा नंगा नाच होऊ शकतो. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल अयोग्य आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले. आज ठाकरे गटाच्या प्रमुखांची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना काही महत्वाच्या सूचना दिल्या. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
ठाकरे म्हणाले, ”निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिला. सध्या सर्वात वादग्रस्त निवडणूक आयुक्त पदावर आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती करताना निवडणुकीच्या पद्धतीने व्हायला हवी. गुंता वाढावा म्हणूनच निवडणूक आयोगाने घाईघाईने निर्णय दिला. शिवसेना नावासह धनुष्यबाण चोरणे पूर्वनियोजित होते. शिवसेना नाव चोरले तरी ठाकरे नाव चोरू शकत नाहीत”, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
”घटनेनुसार शिंदे गट अपात्र ठरला गेला पाहीजे. तसेच निवडणूक आयोग बरखास्त करावा, अशी माझी मागणी आहे. आज ही परिस्थिती शिवसेनेवर म्हणजे आमच्यावर आली. ही परिस्थिती उद्या ते कोणत्याही पक्षावर आणू शकतात. त्यानंतर येणारी 2024 ची निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरेल. तसेच आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आम्ही कुठेही हिंदुत्व सोडलेले नाही”, असंही ते म्हणाले.
”उद्यापासून १६ जणांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. पण जे आमदार फुटून तिकडे गेले ते दोन तृतीयांश नाहीत. १६ आमदार आधी गेले आणि नंतर बाकीचे गेले, त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हायला हवीच. उद्या न्यायालयाच्या सुनावणीत काय होतं? ते पाहणे महत्वाचे आहे, आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून आता शेवटची आशा आहे”, असं ठाकरे म्हणाले.
”आम्ही आजपर्यंत लढत आलोत आणि यापुढेही लढत राहू. एखाद्या पक्षामध्ये वाद झाला तर आजपर्यंत चिन्ह गोठवलं गेल्याचे मी ऐकले आहे. पण हा निर्णय दिला तो अयोग्य आहे. तसेच अमित शाह त्यांना वडीलांप्रमाणे वाटतात असं काल ते म्हणाले, आता त्यांनी माझे वडीलही चोरले. त्यामुळे त्यांना अजून कोण-कोण वडिलांसारखे वाटतात हे त्यांना माहिती”, असं म्हणत त्यांनी शिंदेंना टोला लगावला.