केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

त्यानंतर आज पक्षचिन्हं आणि पक्ष नाव याबाबत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. बोलताना ते म्हणाले की, मशाल हे चिन्हं गेल्यास आणखी 10 चिन्हं माझ्या मनात असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. तर आता जागे झालो नाही तर 2024 मध्ये हुकुमशाही येईल असंही कार्यकर्त्यांना उद्देशून उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला दोन वेगवेगळी चिन्हं आणि नाव देण्यात आली होती. त्यावेळी ठाकरे गटाला मशाल हे चिन्हं देण्यात आलं होतं. आता हे चिन्हं गेलं तरी इतर 10 चिन्हं आपल्या मनात असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत म्हंटलं आहे.

अधिक वाचा  माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, शिक्षा स्थगिती विरोधात हायकोर्टात याचिका १८ मार्च रोजी पहिली सुनावणी

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही असंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे. याशिवाय सध्या सर्वात कठीण प्रसंग आहे. आता जर आपण जागे झालो नाही तर 2024 मध्ये हुकुमशाही येईल असंही त्यांनी म्हंटल आहे. आज शिवसेना संपवण्याचा प्लॅन आहे.