पनवेल दि. २० (प्रवीण रा. रसाळ) कुळवाडी भूषण, बहुजनप्रतिपालक लोकराजा, जाणता राजा, राजराजेश्वर, छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवीन पनवेल, देवद गाव येथील हरे कृष्ण को. ऑप. हौसिंग सोसायटी मधील सन्मानिय सभासद आयु. विनोद कदम यांच्या घरी त्यांचा वयक्तिक छत्रपतींची मूर्ती स्थापना कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमास महामानव विचार मंच या संस्थेचे सन्मानिय अध्यक्ष आयु. उत्तम कांबळे तसेच आयु. हरेश खैरे, आयु. प्रवीण रा. रसाळ, आयु. विशाल जाधव, आयु. अनिल कदम तसेच सन्मानिय महिला सदस्या विधिता कदम, सीमा मोरे, स्वाती कांबळे, रुपाली मोरे, वैशाली रसाळ, सुप्रिया मोहिते तसेच हरे कृष्ण को. ऑप. हौसिंग सोसायटीचे संजूक्ता पाणीग्रही, मीना सुनेरा, तारा तांडेल, धनश्री पाटील तसेच परिसरातील सन्मानिय स्त्री-पुरुष सदस्य उपस्थित होते.

अधिक वाचा  राज्याचे ‘कर्ज झाले तिप्पट महसुली तूटही दुप्पट…..’; ‘स्थानिक’च्या निवडणुका या निधीत 11 % वाढ तर लाडकी बहीण निधी एवढ्या कोटींनी कमी

सदर प्रसंगी आयु. प्रवीण रा. रसाळ यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली व आयु. विनोद कदम यांच्या आग्रहास्तव महामानव विचार मंच संस्थेचे अध्यक्ष आयु. उत्तम कांबळे व आयु. प्रवीण रा. रसाळ यांच्या हस्ते छत्रपतींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

सदर प्रसंगी हरे कृष्ण को. ऑप. हौसिंग सोसायटीच्या जेष्ठ महिला सदस्या सौ. तारा तांडेल (आई) यांच्या शुभहस्ते ज्योत प्रज्वलन करण्यात आले तर आयु. सुप्रिया मोहिते यांनी अगरबत्ती प्रज्वलित केली व उपस्थित सर्वांनी पुष्यसुमन अर्पण केले.

तद्नंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात आयु. उत्तम कांबळे यांनी लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी विचार मांडताना “छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण, त्यांच्या आयुष्यात आलेले चढउतार, स्वकीय व परकीयांना कडवी झुंज देत त्यानी स्थापन केलेले स्वराज्य व आज त्यांच्या पुण्याईमुळे आपण बघत असलेले सोन्याचे दिवस” यावर आपले मत व्यक्त केले, सोबतच त्यांनी “स्वप्नील यादव, शरद ढोणे, मिलिंद जाधव, दीपक जाधव, संजय कांबळे यांच्या सहकार्याने पनवेल विभागात आपण सुरू करत असलेल्या नवीन महामानव विचार मंच या संस्थेची माहिती, ध्येय, उद्दिष्टे, कार्यप्रणाली यांची थोडक्यात माहिती देऊन उपस्थितांना संघटनेत सामील होण्याचे आव्हान केले, सदर संस्था ही केवळ सणवाराला डिजेवर गाणी लावून धिंगाणा घालणारी नसून विभागात अनेक विधायक कामे करण्यासाठी तसेच शोषित, वंचित, गोरगरीब जनतेच्या न्यायहक्कांसाठी प्रयत्नशील राहणारी असेल” अशी ग्वाही ही त्यांनी दिली.

अधिक वाचा  अजितदादांचं Dream बजेट पाहिलं का? 5 वी घोषणा समजून घ्या या अर्थसंकल्पातील 7 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे…

सरतेशेवटी आयु. विनोद कदम व आयु. विधिता कदम यांनी जिलेबी वाटप करून उपस्थितांचे तोंड गोड केले, प्रवीण रा. रसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले व सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा करून कार्यक्रमाची सांगता केली.