शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा आझादनगर कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आले. यावेळी ७५ बाल वक्तांनी सहभाग नोंदवला. विजेतांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले व सर्व सहभागी स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांच पुस्तक व प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष राज गोविंद जाधव, हिंमाशू इंगोले, ऋषीकेश पाटील, सार्थक मोकाटे, तेजस राऊत, अथर्व गाढवे, सुयश माथवड, सदाशिव अलाट, प्रशांत चव्हान, गणेश मांडके, निहाल शेख, प्रथम परीटे, निखील शिंदे, अभिषेक माने, रोहन गाढवे, विशू मोहोळ, विश्वास खवळे, श्रीरंग डोंगरे, साई ववले, मयूर मोहोळ, सुजित फाळके उपस्थित होते. परिक्षक म्हणून प्रा. अरूण माने सर व प्रा. नामदेव अंबवडे सर होते. अमीर शेख, भुषन रानभरे, विजय खळदकर, मनिषा करपे, शारदा विर यांच्या हस्ते विजेतांना सन्मानचिन्ह देण्यात आले. लहान मुलांना वक्तृत्वा साठी व्यासपीठ देण्याच प्रयत्न व नाचण्यांपेक्षा वाचनावर भर देऊन विचारांची शिवजयंती साजरी करा असे शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष राज गोविंद जाधव यांनी संभोदित केले

अधिक वाचा  संजय शिंदेंनी पुन्हा शड्डू ठोकला; म्हणाले ‘करमाळा सोडून कुठेही जाणार नाही, माझी आयुष्यभराची कर्मभूमी…’