शिवनेरी गडावर उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपनेते प्रविण दरेकर उपस्थित होते. शिवनेरी गडावर मोठ्या संख्येनं शिवभक्तदेखील उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.

पाळण्याला फुलांची सजावट
शिवरायांच्या जन्मोत्सवासाठी पाळणा तयार करण्यात आला होता. या पाळण्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महिलांनी पारंपरिक वेश परिधान करुन पाळणा जाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला. यावेळी गडावर उत्साहाचं वातावरण पसरलं होतं.

शिवभक्तांचे साहसी खेळ
शिवजन्मोत्सवात मोठ्या उत्साहात शिवभक्तांनी साहसी खेळ सादर केले. ढाेल ताशांचादेखील गजर करण्यात आला. यावेळी अनेक शिवभक्तांनी साहसी क्रिडाचंदेखील सादरीकरण करण्यात आलं. पोलीस खात्याकडून मानवंदना देण्यात आली. पोलीसांच्या बॅंड पथकाने राष्ट्रगीत सादर करुन मानवंदना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

अधिक वाचा  औरंगजेबाची कबर छ. संभाजीनगरमध्ये मग नागपूर अचानक का पेटलं? धार्मिक संदेश लिहिलेले कापड जाळले…….

संभाजीराजे नाराज…
किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शिवजन्माचा शासकीय सोहळा पार पडत असताना छत्रपती संभाजीराजे गडावर पोहचले. त्याच्यांसोबत त्यांचे अनेक समर्थकही होते. शिवाई मंदिरापर्यंत जाण्यास छत्रपती संभाजीराजेंना मनाई करण्यात आली. छत्रपती संभाजी राजेंच्या मते शासकीय शिवजंतीसाठी सामान्य शिवप्रेमींना शिवनेरी किल्ल्यावर येऊ दिलं जात नसल्याने संभाजीराजे नाराज झाले.

सोहळ्यासाठी शिवप्रेमींचा विचार व्हावा; संभाजीराजे

या ठिकाणी शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र, या गर्दीमध्ये सामान्य शिवभक्तांची अडवणूक झाल्याने संभाजीराजे छत्रपती चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी संतप्त भावना आपल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्या.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्टेजवर असतानाचा छत्रपती संभाजी राजेनी काहीच अंतरावर उभे राहून भाषण सुरु केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी विनंती करुनही छत्रपती संभाजीराजे स्टेजवर गेले नाहीत. इथुन पुढे शिवजयंती सोहळ्याचे नियोजन करताना सामान्य शिवप्रेमींचा विचार व्हावा, अशी मागणी केली.

अधिक वाचा  भाजप त्यांना जगूच देत नाही काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून एकनाथ शिंदे, अजित पवारांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर, म्हणाले “आम्ही दोघांनाही.”

पुढच्या शिवभक्तांची अडवणूक होणार नाही; देवेंद्र फडणवीस

पुढच्या वर्षी कोणत्याही शिवभक्तांची अडवणूक केली जाणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. छत्रपती शिवरायांच्या विचारानेच हे सरकारम काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले. हे सरकार सर्वसामान्यांचे असल्याचेही ते म्हणाले.

शिवरायांचा मावळा मुख्यमंत्री झाला; एकनाथ शिंदे
शिवरायांचा मावळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे यानंतर कोणत्याही शिवभक्ताची गडावर येण्यास अडवणूक केली जाणार नाही. पुढच्या वर्षी शिवजयंतीचं नियोजन करताना शिवभक्तांचा आधी विरार करु असं ते म्हणाले. त्यासोबतच ऐतिहासिक ठेवा जपण्याचं काम सरकार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  भाजपकडून विधान परिषदेसाठी 3 उमेदवारांची नावे जाहीर; यांची लॉटरी लागली तर यांच्या वाटेला वाटण्याच्या अक्षदा?