मुंबई : ठाकरे गटाला टेन्शन देणारी आणखी एक बातमी आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे. 26 फेब्रुवारीपर्यंतच या चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरण्याची मुदत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला 26 फेब्रुवारीनंतर हे चिन्ह वापरता येणार नाही. तशी ऑर्डरच निवडणूक आयोगाने काढली आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्ये खळबळ उडाली.

अधिक वाचा  पुणे महापालिका ‘प्रशासकराज’ अधिकाऱ्यांची अनाधिकृत बांधकाम व्यावसायिक सलगी कायमच; एकीकडे मनाई दुसरीकडे ताबा देण्याची लगीनघाई 

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह तात्पुरतं दिलं होतं. 26 फेब्रुवारीपर्यंतच हे नाव वापरण्याची मुदत ठाकरे गटाला देण्यात आली आहे. म्हणजे चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपर्यंतच ठाकरे गटाला पक्षाचं हे नाव आणि चिन्ह वापरता येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या जवळच्याच माणसाने ‘घात’ केला? ठाकरे गटाच्या खासदाराकडून शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र
त्यानंतर त्यांना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. हे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी किंवा नवीन नाव आणि चिन्ह घेण्यासाठी ठाकरे गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावं लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अधिक वाचा  तरुणीचा जबाब ते गाडेवर सात गुन्हे..! स्वारगेट प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?

म्हणूनच नवं चिन्ह दिलं
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर हक्क सांगितला होता. त्यानंतर निवडणूक निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे नाव दिलं होतं. तर ठाकरे गटाच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं होतं. शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं होतं.

तर शिंदे गटाचे चिन्ह गोठवलं जाईल
काल निवडणूक आयोगाचा शिंदे आणि ठाकरे गटातील वादावर निर्णय आला होता. यावेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव वापरण्याची परवानगी दिली. त्यामुळे आता ठाकरे गटाला 26 फेब्रुवारीनंतर निवडणूक आयोगाने दिलेलं मशाल चिन्ह वापरता येणार नाही. ठाकरे गट सोमवारी कोर्टात गेल्यास शिंदे गटाला मिळालेलं धनुष्यबाण चिन्हं गोठवलं जाण्याची शक्यता आहे, असं ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलं.

अधिक वाचा  औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर टाकून द्या; वादग्रस्त बोलणाऱ्यांवर अजामिन पात्र गुन्हा दाखल केला पाहिजे: उदयनराजे भोसले कडाडले