शिवसेना आणि धनुष्यबाण निसटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकशाही संपली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगावं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दिली. त्याशिवाय निवडणूक आयोगाच्या निर्णायाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेय. निवडणूक आयोगाचा हा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन 75 वर्षाचं स्वातंत्र्य संपलेलं आहे, असे जाहीर करावे. लोकशाहीला आदरांजली वाहून बेबंदशाहीला सुरुवात झाल्याचं मोदींनी जाहीर करावे.

अधिक वाचा  दादा खिंडकरने ओंकार सातपुतेला का मारलं? धनंजय देशमुख यांनी सांगितलं, परमेश्वर सातपुतेंनाही दिलं उत्तर

न्यायव्यवस्था दबावाखाली कशी येईल, याची अनेक उदाहरणं पाहिली आहेत. आजचा हा निर्णय अत्यंत अनेपेक्षित आहे, कारण जवळपास सहा महिने सर्वोच्च न्यायालयत सुरु आहे. त्याची आता सलग सुनावणी सुरु होईल. तो निकाल लागेल तोपर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय देऊ नये.

कदाचित एक दोन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागतील. त्यांना मुंबईला भिकेला लावून दिल्लीश्वरांच्या दारात उभे करायचं आहे. शिवसेना लेचीपेची नव्हती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राजमान्यता मिळाली तरी चोर हा चोरच असतो, असा टोला लगावला. हिंमत असेल तर निवडणुका घ्या, शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाणाचं तेज जनता मिंधे गट आणि भाजपला नक्कीच दाखवणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार आहे. नामर्द कितीही मातला तरी मर्द होऊ शकत नाही. राजमान्यता मिळाली तरी चोर हा चोरच असतो. चोराला चोरी पचणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

अधिक वाचा  अजितदादांचा काँग्रेसला मोठा दणका; ‘स्थानिक’च्या निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये ताकद वाढणार; दोन बडे नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

यंत्रणांचा वापर करून जेवढा आमच्यावर अन्याय कराल त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. कोर्टातील निकालार्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देणं चुकीचं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आले. लोकशाहीचं वस्त्रहरण होत असलेलं आम्ही खपवून घेणार नाही. अनेक घटना तज्ज्ञांनी सांगितलं आहे की 16 आमदार अपात्र ठरतील. परंतु, न्यायालयाच्या निकाला आधीच हा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दोन महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील

“कदाचित एक दोन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागतील. त्यांना मुंबईला भिकेला लावून दिल्लीश्वरांच्या दारात उभे करायचं आहे. शिवसेना लेचीपेची नव्हती, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  देशमुख हत्या प्रकरणातील न्यायाधीशांची निलंबित अन् रजेवर पाठवलेल्या पोलिसांसोबत धुळवड?