आपल्या विधानांनी वादग्रस्त ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज पदमुक्त झाले. तसेच कोश्यारींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. सत्ताधारी भाजप-शिंदे गटाकडून राज्यपालांच्या कामाबाबत कौतुक करण्यात आले. मात्र, जाता-जाताही कोश्यारींना राष्ट्रवादीने पुन्हा एकदा डिवचले आहे. इतिहासाला शुन्य मार्क देत आणि प्रगती न म्हणता अधोगती पुस्तक असं म्हणत टोला लगावला. राष्ट्रवादीने कोश्यारी यांच्याबाबत एक उपहासात्मक मार्कशीट तयार करत ते सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप विद्यालयाची ही मार्कशीट असून त्यामध्ये ढ तुकडी असाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच याला प्रगती पुस्तक न म्हणता अधोगती पुस्तक असं म्हणत त्यामध्ये विविध विषयांचे मार्क दाखवण्यात आलेत. भगतसिंह कोश्यारी यांची तुकडी ढ असं या मार्कशीटवर लिहिण्यात आलं आहे.तसेच हजेरी क्रमांक ४२ असंही लिहिण्यात आलंय. याबरोबरच विषयाचे मार्कही देण्यात आलेत. यामध्ये इतिहासला (00), भूगोल (३५), नागरिक शास्त्र (१७), सामान्य ज्ञान (३४) कला (१००) असे मार्क देण्यात आले आहेत.

अधिक वाचा  नाना पटोले यांची एकनाथ शिंदे अन् अजित पवार यांना CM पदाची ऑफर, बावनकुळेंनी दिला टोमणेवजा सल्ला

या मार्कशीटवर शेरा देखील देण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेवर पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. तसेच विद्यार्थ्याची वर्तणूक पाहता बालवाडीपासून सुरुवात करणे योग्य राहील, असं म्हणत राष्ट्रवादीने कोश्यारींना डिवचलं आहे. दरम्यान, हे मार्कशीट राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडवरून शेअर करण्यात आलं आहे. त्यामुळे जाता-जाताही भगतसिंह कोश्यारींना राष्ट्रवादी काँग्रेसने डिवचले आहे.