व्हॅलेंटाईन डे निमित्तानं जिकडे तिकडे प्रेमाला बहर आलेला दिसतो. सोशल मीडियावर हा बहर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटीपंर्यंत साऱ्यांच्या पोस्टच्या रुपात समोर आलेला दिसत आहे. आता सर्वसामान्य लोकांना सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्यात नेहमीच इंट्रेस्ट असतो. त्यात खासकरुन कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री कोणाला डेट करतायत याबाबत तर जरा अधिकच उत्सुकता असते सर्वांना. त्यामुळे आजच्या प्राजक्ता माळीच्या व्हॅलेंटाईन स्पेशल पोस्टला म्हणूनच वजन आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या रिलेशनशीपच्या अनेक चर्चा कानावर पडत आहे. तिचं प्रेम ते तिचं ब्रेकअप सारं काही. आता झालं गेलं सगळं जुनं झालं पण सध्या मॅडम सिंगल आहेत का हा प्रश्न सगळ्यांनाच होता. त्यामुळे आज व्हॅलेंटाईन डे निमित्तानं प्राजक्तानं पोस्ट करत आपल्या रिलेशनशीप स्टेट्स विषयी पोस्ट करत जाहीर करून टाकलं आहे. प्राजक्ता माळीनं एक पोस्ट केलीय..जी खरंतर एक फोटो पोस्ट आहे. लाल रंगाच्या साडीत प्राजक्तानं छान छान फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन देत आपलं रिलेशनशीप स्टेट्स जाहीर करून टाकलं आहे.

अधिक वाचा  जुन्या नव्यांचा संगम असलेल्या रोहित सेनेची चॅम्पियन्स ट्रॉफी कामगिरी; काय काय केले विक्रम? विजयी ‘पंच’… 9 महिन्यांतच दुसरी ट्रॉफी

प्राजक्तानं फोटोंना कॅप्शन दिलं आहे की, ”Be your own valentine
Zone; to be continued..🤪
.
(अखिल भारतीय single संघटनेचे सदस्य. तुम्ही एकटे नाही.., मी ही तुमच्यात सहभागी आहे..
.
Loving this freedom though..☺️
Anyway, guys…
Be the love, spread the love. Coz love is the only thing we all should believe”.

प्राजक्तानं आपण सिंगल असल्याचं जाहीर केलं आहे. आता या सोशल मीडियावरच्या खास सेलिब्रिटीच्या पोस्टवर लोकांच्या कमेंट्स आल्या नसत्या तर नवल.

एकानं लिहिलं,’तु गोरी असुन पण सिंगल कशी काय?’, तर आणखी एकानं लिहिलंय,’एवढी प्रतिभावंत व्यक्ती single असेल तर आम्ही काहीच नाही. धन्यवाद आमच्या दुःखात सहभागी झाल्याबदल’ ,तर कुणी एकानं,’पण तू आमच्यात सामील होण्यापेक्षा आमच्यातून एकाला कमी का करत नाहीस’. असं म्हणत थेट प्राजक्ता समोर प्रपोजलच ठेवलं आहे.

अधिक वाचा  एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी ‘या’ नेत्याला देणार संधी