कॉर्पोरेट आणि व्यक्तिगत देणग्यामध्ये भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. भाजपला कार्पोरेट क्षेत्रातून ५४८.८१ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. व्यक्तीगत ६५.५७ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. मिळालेल्या देणग्यांमुळे भाजपने अन्य पक्षांना मागे टाकले आहे. एडीआरनुसार असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) काँग्रेससह सर्व पक्षांना मिळालेल्या देणग्या मिळून जेवढी रक्कम होते त्याच्या तीन पट देणगी ही एकट्या भाजपला मिळाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

२०२१-२०२२ या आर्थिक व वर्षांत भाजपला मिळालेल्या देणगीच्या रक्कमेत १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेल्या 20 हजारांहून अधिक देणग्या 780.77 कोटी होत्या, ज्या एकूण 7141 डोनेशन्समधून प्राप्त झाल्या होत्या. एडीआरच्या अहवालानुसार यावर्षी मिळालेल्या देणग्यांमध्ये 187 कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. त्या आधीच्या वर्षी ७,१४१ रुपयांची वाढ झाली होती. राजकीय पक्षांचा विचार केला तर काँग्रेससह अनेक पक्षांना ळालेल्या देण्यापेक्षा तीन पट जास्त रक्कम ही भाजपला मिळाली आहे.

अधिक वाचा  विकी कौशल ‘या’ गंभीर आजारातून सुखरूप बाहेर; हातपाय उचलणे देखील झाले होते बंद

बसपाची तिजोरी रिकामीच

भारतीय जनता पक्षाला गेल्या वर्षी 614.6 कोटी रुपये देणग्या मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला 95.4 कोटी रुपये मिळाले आहेत. बहुजन समाज पक्षाने सलग 16 व्या वर्षी 20,000 रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळाली नसल्याचे जाहीर केले.

काँग्रेसला 95.459 कोटी

2020-21 या आर्थिक वर्षात काँग्रेसला मिळालेली देणगी 74.524 कोटी होती, जी 2021-22 या आर्थिक वर्षात वाढून 95.459 कोटी झाली आहे. यामध्ये 28.09 टक्के वाढ दिसून आली. आर्थिक वर्ष 2019-20 आणि आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान काँग्रेसच्या देणगीत 46.39% ची घट झाली आहे.

अधिक वाचा  ”एक लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या दहा योजना सुरु करता येतील”, शिंदे गटाच्या नेत्याचं विधान चर्चेत!

भाजपला 614.626 कोटी रुपये

भाजपकडून जाहीर केलेल्या देणग्या ह्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), नॅशनल पीपल्स पार्टी आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस यांनी जाहीर केलेल्या देणग्यांच्या तिप्पट आहेत. भाजपने 4,957 देणग्यांमधून एकूण 614.626 कोटी रुपये जाहीर केले आहेत. यानंतर काँग्रेसने 1,255 देणग्यातून 95.45 कोटी रुपये जाहीर केले.

एकूण देणगीत 187.026 कोटींची वाढ

2021-22 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांच्या एकूण देणगीत 187.026 कोटींची वाढ झाली आहे, जी मागील आर्थिक वर्ष 2020-21 पेक्षा 31.50 टक्के अधिक आहे.

अधिक वाचा  उसाच्या एफआरपीबाबत न्यायालयाचा सरकारला झटका! दिला मोठा निर्णय

2020-21 मध्ये भाजपला मिळालेली देणगी 477.545 कोटी होती, जी 2021-22 मध्ये 614.626 कोटी झाली. ज्यामध्ये 28.71 टक्क्यांची वाढ दिसून आली.