त्रिपुरात आज (ता.१६) मतदान सुरु झाले आहे. 60 विधानसभा जागांवर 259 उमेदवारांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजप, काँग्रेस-सीपीआयएम आणि टिपरा मोथा अशी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. मतदानांसाठी संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे. 28 लाख मतदार आहेत. निकाल २ मार्च रोजी लागेल. भाजपने आयपीएफटीच्या सहकार्याने निवडणूक लढवली आहे. भाजप 55 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर त्यांचा मित्रपक्ष आयपीएफटी 5 जागांवर निवडणूक लढवत आहे. याशिवाय काँग्रेस-डाव्यांमधील जागांच्या करारानुसार, डावी आघाडी 43 जागांवर तर काँग्रेस 13 जागांवर निवडणूक लढवत आहेत. एका जागेवर काँग्रेस आणि डाव्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. प्रद्योत बिक्रम यांच्या टिपरा मोथा या नव्या पक्षाने राज्यातील 60 पैकी 42 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसी राज्यात केवळ 28 जागांवर निवडणूक लढवत आहे. याशिवाय 58 उमेदवार अपक्ष असून इतर पक्षांचेही काही उमेदवार रिंगणात आहेत.

अधिक वाचा  संतोष देशमुख प्रकरणाची पहिली सुनावणी; वाल्मिकचा उतरला माज, कोर्टात आकाला पाहून चेलेही हादरले

राज घराण्याशी संबंधित प्रद्योत किशोर माणिक माणिक्य देववर्मांची टिपरा मोथा पार्टी कोणाचाही खेळ बिघडवू शकते. २०१८ च्या निवडणुकीत अनुसूचित जनजातीच्या २० जागा भाजपकडे आल्या होत्या. आता टिपरा मोथा आदिवासी भागातील २० जागांवर प्रभावी आहे. गाववस्त्यांच्या पंचायतींत ती सहभागी आहे.

2018 ची स्थिती

एकूण जागा- 60

भाजप+ आयपीएपटी – 44

माकप- 16, काँग्रेस- 0