कसबा पोटनिवडणुकीत भाजपला सगळ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. कसबा पोटनिवडणुकीत मविआ आणि भाजपने प्रतिष्ठेची केला आहे. मविआकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून हेमंत रासने यांच्यात थेट लढत होत आहे. या लढतीत महाविकास आघाडीसोबत भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे. दोन्ही पक्षांकडून दिग्गज नेत्यांनी कसब्यात तळ ठोकलं आहे, सोबतच स्टार प्रचारकांची फौज मैदानात तयार ठेवली आहे. आज देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन पुण्यात आहे. या दोघांनी कसब्यात गिरीश बापट यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांना कसबा हातातून जाऊ द्यायचा नाही. त्यामुळे चे स्वत: मैदानात उतरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचे अध्यक्षांची भेट घेतली. पुण्यातील सर्व मानाचे पाचही गणपती कसबा विधानसभा मतदारसंघातच येतात. त्यामुळे फडणवीसांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
पुण्यातील अनेक बड्या उद्योगपतींसोबत देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. उद्योगपती पुनीत बालन, उद्योगपती फत्तेचंद रांका यांचीही फडणवीस यांनी भेट घेत चर्चा केली. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस धार्मिक आणि व्यावसायिक दोन्ही बाजू मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.