पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभरात अनेक ठिकाणी मंदिरं तयार करण्यात आली आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूरतमध्ये चक्क सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सध्या हा चर्चेचा विषय आहे. 18 कॅरेट सोन्यापासून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपनं 156 जागांवर विजय मिळवला होता. त्या पार्श्वभूमीवर 156 ग्रॅम वजनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली होती.
मूर्तीचं वजन काय?
ज्वेलरी तयार करणाऱ्या राधिका चेन्स कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती तयार केली आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकहाती विजय मिळवला होता. भाजपने 182 जागांपैकी 156 जागांवर विजय मिळवला होता. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 156 ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार केली आहे, असे राधिका चेन्स कंपनीच्या मालकानं सांगितलं. अनेक लोकांनी ही मूर्ती खरेदी करण्यासाठी उत्साह दर्शवला आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती चर्चेचा विषय आहे. मूर्तीकारांनी ही मूर्ती विकण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही.
20 जणांनी तयार केली मूर्ती –
मूळचे राजस्थानमधील बोहरा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी चाहता आहे. त्यांना समर्पित करण्यासाठी काहीतरी खास तयार करम्याचा विचार करत होताो. आमच्या कारखान्यात अनेक मूर्त्या तयार केल्या जातात. त्यामुळे मलाही पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती तयार करण्याची आयडिया सूचली. 156 ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला.. या मूर्तीची अद्याप किंमत ठरलेली नाही. तसेच ही मूर्ती अद्याप विकण्याचा कोणताही विचार नाही. ही मूर्ती तयार करण्यासाठी 11 लाख रुपयांच्या सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
वजन कमी करण्यासाठी अनेक बदल –
याआधी बोहरा यांनी स्टॅच्यू ऑफ यूनिटीची सोन्याची प्रतिकृती तयार केली होती. त्याला विकण्यात आलं होतं. कारागीर म्हणाले की, ही (नरेंद्र मोदी) मूर्ती डिसेंबरमध्येच तयार झाली होती. पण त्याचं वजन 156 ग्रॅमपेक्षा जास्त होतं. त्यातच गुजरातमध्ये भाजपने 156 जागांवर विजय मिळवला, हे समजल्यानंतर कारगिरांना या मूर्तीचं वजन कमी करावं लागले. त्यामध्ये अनेक बदलही करण्यात आले.