महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष केला पोहोचलेला असताना आज निवडणूक आयोगामध्ये दोन्ही गटाचे वकीलही आपापसात भिडले. केंद्रीय निवडणूक आयोगात महेश जेठमलानी आणि देवदत्त कामत यांच्यात जोरदार वाद प्रतिनिधी सभेवरून झाला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने आता समोरासमोर सुनावणी न घेता एक नामी शक्कल लढवत सोमवारी दोन्ही गटांना आपले म्हणणे लेखी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगातच दोन्ही मोठ्या वकिलांमध्ये वाद सुरू झाले वादानंतर निवडणूक आयुक्तांची मध्यस्थी कामी आली. याचिकेत आहे तेवढंच बोला म्हणत जेठमलानी यांनी आक्षेप घेतला त्यानंतर मी माझ्या पद्धतीने बोलणार असे म्हणत कामत यांनीही ताठर भूमिका घेतली. राज्यात सध्या निवडणूक आयोगाची तारीख पे तारीख हा सध्या चर्चेचा विषय असतानाच निवडणूक आयोगाच्या वतीने ही दोन्ही गटांना समरसमोर येण्यास टाळण्याचीच भूमिका घेतली जात आहे.
शिवसेनेचं नाव आणि चिन्हावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी सुरु आहे. ठाकरे गटाचे मुख्य वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरु आहे. पक्षाची घटना, राष्ट्रीय पक्ष कार्यकारिणी, प्रतिनिधी सभा अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. कामत यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला. दोन्ही गदाची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने दोन्ही गटांना येत्या सोमवारी लेखी उत्तर देण्याची सूचना केली.
‘शिंदे गटाचे मुद्दे आम्ही खोडून काढले’- परब
शिंदे गटाचे मुद्दे आम्ही खोडून काढले आहेत. पक्ष म्हणजे आमदार खासदार नसून राष्ट्रीय कार्यकारिणी पण असते हे आम्ही सांगितलंय. सादिक केसचा आणि या केसचा वेगळा संदर्भ आहे. पक्षाच्या कार्यकारिणीत उद्धव ठाकरे हेत पक्ष प्रमुख आहेत. घटनेत बदल केलेले साल २०१८ नंतर २०२२ पर्यंत कोणताही वादग्रस्त मुद्दा शिंदेंनी दाखवला नाही.
धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच – निहार ठाकरे
प्रतिनिधी सभेतील सदस्यच नाहीत तर लोकप्रतिनिधी देखील महत्त्वाचे असतात, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे वकील निहार ठाकरे यांनी दिली. तर सुनावणीनंतर दोन्ही गटाकडून युक्तिवाद झालाय, येत्या 30 तारखेला लेखी उत्तर दिलं जाईल, पक्षाच्या घटनेवर युक्तिवाद झाला, लोकप्रतिनिधी गरजेचे आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद जवळपास १६ मिनिटे युक्तिवाद झाला. मुख्यनेतापद कायदेशीर आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने पक्षात दोन फूट पडली आहे. आम्ही पक्षाच्या घटनेचं पालन केलेलं आहे असा जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.
तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतापद बेकायदेशीर, मुख्य नेतेपद हे पक्षाच्या घटनेत नाही, मुख्य नेतापद हे घटनेत नाही. त्यामुळे ते पद बेकायदेशीर, ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद कामत यांनी करत राजकीय पक्ष म्हणून आमचं संख्याबळ विचारात घ्यावं, असे सांगितले. पक्ष संघटनात्मक संख्याबळ आणि लोकप्रतिनिधींची संख्याबळ यात फरक आहे. त्यामुळे सादिक अली केस या प्रकरणात लागू होत नाही, असेही देवदत्त कामत यांनी सांगितले.
कपिल सिब्बल यांचा एक तास युक्तिवाद सुरु
शिंदे गटाच्या याचिकेत खोटी विधाने, हा वाद संसदीय कार्यपद्धतीची थट्टा आहे. प्रतिनिधी सभा आमच्या बाजूने, प्रतिनिधी सभाच पक्ष चालवते, पक्ष सोडून गेलेले सदस्य सभेचा भाग होऊ शकत नाही असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. आम्ही सर्व कारभार प्रतिनिधी सभाच्या माध्यमनातून करतो, त्यामुळे सभा आमच्या बाजूने, प्रतिनिधी सभाच्या कार्यकारिणीसाठी मुदतवाढ देण्याची कपिल सिब्बल यांनी मागणी केली. प्रतिनिधी सभेला जितके अधिकार आहेत तितके अधिकार कुणालाच नाही. लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं, गुवाहाटीला का गेले? पक्षाच्या सभेत शिंदे गट उपस्थित नव्हते. शिंदे गट राजकीय पक्ष नाही. त्यांनी निवडणूक आयोगात कोणतीही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे शिंदे गट स्वत:ला राजकीय पक्ष म्हणत असेल तरी शिंदे गट राजकीय पक्ष नाही. शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता, सादर केलेल्या 61 पैकी 28 जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्रे नाहीत, शिंदे गट प्रतिनिधी सभा होऊ शकत नाही असा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.