सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण सातत्याने कापासाच्या दरात घसरण होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करण्याचा निर्णय घेतल आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवूण ठेवला आहे. त्यामुळे राज्यातील कापसावर प्रक्रिया करणारे जवळपास 80 टक्के जिनिंग बंदच आहेत. तर काही 20 टक्के जिनिंग सुरु करण्यात आले होते. तेही आता कापसाच्या अभावी बंद पडले आहेत.

कापसाला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

यंदा राज्यात कापूस उत्पादन चांगलं झालं आहे. मात्र, सध्या कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्री न करता आपल्या घरात कापूस ठेवावा लागत आहे. कापसाला चांगला भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. यामुळे राज्यातील कापसावर प्रक्रिया करणारे जवळपास 80 टक्के जिनिंग बंदच आहेत. राज्यात सुमारे 500 च्यावर जिनिंग आणि त्यात काम करणारे सुमारे 3 लाख मजूर आहेत. ज्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे.

अधिक वाचा  महात्मा फुले योजना थकीत बिलांपोटी ११६२ कोटी मंजूर; राज्यभरात रुग्णालयांचा कोंडलेला श्वास झाला मोकळा

राज्यातील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी
पश्चिम विदर्भातील कापूस हा उच्च दर्जाचा असून त्याचा लांब धागा निघत असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया यासारख्या देशांमध्ये मोठी मागणी असूनही यंदा कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग कापसाअभावी बंदच आहेत. त्यामुळे राज्यातील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुणावत आहे. मात्र, शेतकऱ्यांना उत्पादनावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह जिनिंग चालकही संकटात सापडले आहेत. यावर अवलंबून असलेले तीन लाख कामगार देखील संकटात सापडले आहेत.

कधी होणार कापसाच्या दरात सुधारणा?

मागील वर्षी कापसाच्या गुणवत्तेनुसार 10 हजारापासून ते 13 हजार रुपयापर्यंत भाव मिळाला होता. यंदा मात्र, हा कापूस दर अद्यापही आठ ते साडेआठ हजार रुपयांवर स्थिरावला आहे. अधिक भाव वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळ असलेला कापूस विक्रीसाठी न आणता तो घरातच राखून ठेवणं पसंत केलं आहे. त्यामुळे कापसाच्या दरात कधी वाढ होणार याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. दराचा मुद्दा सुरु असतानाच दुसरीकडे कापूस चोरीच्या घटना सतत समोर येत आहेत. गोदामात साठवून ठेवलेला कापूस चोरुन नेला जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

अधिक वाचा  अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; मंत्री आदिती तटकरेंकडून महत्त्वाची घोषणा