बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील रामदेव बाबा नगर परिसरात क्रिकेट सामन्यात मॅच जिंकल्यावरून दोन गटात तुफान राडा झाल्याची माहिती समजली आहे. ज्यावेळी राडा झाला त्यावेळी तिथल्या एका मंदिरावरती दगडफेक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर दोन्ही गटात हाणामारी सुध्दा झाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली असून पोलिस फरारी आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती सांगितली आहे. विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम गट एकमेकांविरोधात भिडले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

क्रिकेट मॅच संपल्यानंतर दोन्ही गटात तुफान राडा झाला. एकमेकांना मारहाण सुध्दा करण्यात आली आहे. ज्यावेळी एकमेकांमध्ये मारहाण सुरु होती. त्यावेळी काही तरुणांनी तिथं असलेल्या एका मंदिरावर दगडफेक, त्यावेळी मंदिर परिसरात कोणीचं नसल्यामुळे कसल्याच प्रकारची हाणी झालेली नाही. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील रामदेव बाबा नगर परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून दोन्ही गटातील 20 जणांवर मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सगळे आरोपी फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. परिसरात तुफान दगडफेक झाल्याने परिसरात अद्यापही दहशत असून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे अशी माहिती अशोक रत्नपारखी, ठाणेदार यांनी दिली आहे.

अधिक वाचा  तरुणीचा जबाब ते गाडेवर सात गुन्हे..! स्वारगेट प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?