शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. शिंदे यांनी आपल्या सोबत शिवसेनेतील जवळपास ४० आमदार फोडून भाजप सोबत नव समीकरण जुळवलं. त्यांनंतर शिंदे गटाने पक्षावर आणि पक्ष चिन्हावरच दावा केला. त्यामुळे ठाकरे-शिंदे यांच्यात कायदेशीर बोलणी चालू झाली. परिणामी शिवसेनेत दोन गट तयार झाले एक उद्धव ठाकरे गट आणि दुसरा एकनाथ शिंदे गट, यामुळे खरी शिवसेना आमचीच असा दावा शिंदे गटाने केला. या दोन गटाचा वाद अखेर कोर्टात गेला.

पक्ष चिन्हाचा वाद निवडणुक आयोगात तर पक्षाच्यानावाचा वाद सुप्रिम कोर्टात. दरम्यान येत्या 17 जानेवारीला निवडणूक आयोग चिन्हावर निर्णय देणार आहे. त्यामुळे दोन्ही गट गॅसवर असणार. मात्र उद्धव ठाकरे गटाने चिन्हा शिवाय लढण्याचा निर्णय घेतला आहे. जर 17 जानेवारीला निवडणूक आयोगाने चिन्हाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिला तर ठाकरे गटाने दोन प्लॅन तयार ठेवले आहेत. एक म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे तर दुसरा प्लॅन म्हणजे थेट जनतेतूनच पक्षाचं चिन्ह आणि नाव मागवणार आहे. अशी माहिती साम टीव्हीच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

अधिक वाचा  विधानसभा मदतीची परतफेड ११०० कोटींची साखरपेरणी; सत्ताधाऱ्यांच्या आठ कारखान्यांना सरकारच्या हमीने कर्ज

सादिक अली खटल्यानुसार निकाल लागला तर शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार अशीही चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाने निर्णयाचा वाट न बघता तयारी सुरू केली असल्याचे सांगितलं जात आहे.