मुंबई : राजकीय वर्तुळातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं आहे. शरद यादव यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शरद यादव यांची गुरुग्राममधील फोर्टीस हॉस्पीटलमध्ये प्राणज्योत माळवली. शरद यादव यांची मुलगी शुभाशिनी यादव यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. शरद यादव यांच्या निधनामुळे राजकीय विश्वावर शोक पसरला आहे. राजकीय विश्वातील दिग्गज व्यक्ती गेल्याने हळहळ व्यक्ती केली जात आहे.
शरद यादव यांची लेक शुभाशिनीने “बाबा नाही राहिले”, अशी भावूक पोस्ट करत शोक व्यक्त केला. या दिग्गज नेत्याने बिहारच्या राजकारणात गेल्या अनेक दशकात अनेक चढ-उतार पाहिले. बिहारच्या राजकीय घडामोडीत यादव यांचा सक्रीय सहभाग होता.