नाशिकः नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे सध्या सबंध राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. ऐनवेळी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने सर्वांच्याच नजरा नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे लागून राहिल्या आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ऐन रंगात आलेली आहे. काँग्रेसने सत्यजीत तांबे यांच्या वडिलांना उमेदवारी जाहीर केली परंतु त्यांनी शेवटपर्यंत अर्ज भरला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सत्यजीत तांबे यांना भाजपने ए.बी. फॉर्म दिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यासंबंधी तांबेंना प्रश्न विचारला असता त्यांनी नकार दिला. तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला काँग्रेस पक्षाचा ए.बी. फॉर्म मिळाला नसल्याचं तांबेंनी सांगितलं.

अधिक वाचा  भाजप त्यांना जगूच देत नाही काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून एकनाथ शिंदे, अजित पवारांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर, म्हणाले “आम्ही दोघांनाही.”

पुढे बोलतांना सत्यजीत तांबे म्हणाले की, मी काँग्रेसचाच उमेदवार आहे. तरीही भाजपची मदत मिळावी म्हणून मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती करणार आहे. आपली राजकीय परंपरा प्रगल्भ आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या जागा आपल्याकडे बिनविरोध होतात. त्यामुळे भाजपची मदत मिळेल, असं तांबे म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देऊनही त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे विखे पाटलांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देऊ, असं मत व्यक्त केलं आहे.

अधिक वाचा  संतोष देशमुख पत्नीच्या जबाबातून धक्कादायक दावा उघड; हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुख पत्नीला काय बोलले?