चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची अनेकांना धास्ती होती. हॉर्नचे आवाज, वाहनांच्या रांगा, कोंडीत अडकलेली रुग्णवाहिका असो की विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस… या सर्वांनाच वाहतूक कोंडीचा जबर फटका बसलेला. आता मात्र परिस्थिती बदलत आहे. आठ रॅम्पचे काम पूर्ण झाले, अंडरपास व पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. अजूनही सकाळी व सायंकाळी काही प्रमाणात कोंडी होते. मात्र, त्याची तीव्रता कमी आहे. लवकरच ११५ मीटर लांबीच्या पुलाच्या कामास सुरवात होईल. या पुलासाठी रस्त्यावर एकही खांब नसेल. पुलाचे डिझाइनही तयार झाले. जेव्हा हा पूल तयार होईल, तेव्हा रॅम्प जोडले जाणार आहेत. परिणामी, चांदणी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची पूर्णपणे सुटका होईल.

अधिक वाचा  एअरपोर्ट रोडवर अंदाधुंद गोळीबार, गोळ्या झाडून हायप्रोफाईल नेत्याची हत्या, शहरात खळबळ

एनडीए-पाषाण पूल २ ऑक्टोबर २०२२ ला पहाटे पाडण्यात आला. १० जानेवारीला याला १०० दिवस पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने चांदणी चौक येथे सुमारे ३९७ कोटी रुपये खर्चून आठ रॅम्प, तीन अंडरपास व एक ओव्हरपास (पूल) बांधण्याचे काम सुरू आहे. याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, तर जागेचे संपादन न झाल्याने एक अंडरपासच्या कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. दुसरीकडे एनडीए-पाषाण जोडणाऱ्या पुलाचे काम जुलै २३ पर्यत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आता आठही रॅम्पचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पूलच नसल्याने त्याला जोडता येत नाही. पूल बांधल्यावर त्या रॅम्प पुलाशी जोडले जातील. तेव्हा सध्या मुख्य रस्त्यावरून सुरु असलेली वाहतूक पुलावरून सुरु होईल. परिणामी, मुख्य रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन वाहतूक कोंडी टळेल.

अधिक वाचा  संतोष देशमुख प्रकरणाची पहिली सुनावणी; वाल्मिकचा उतरला माज, कोर्टात आकाला पाहून चेलेही हादरले

चांदणी चौकातील रॅम्पचे काम पूर्ण झाले आहे. एकूण कामाचा विचार केला तर ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासह नवीन पुलाचे काम जुलै २०२३ पर्यंत होईल.

– संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे