भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार व ज्येष्ठ नेते श्री.हर्षवर्धन पाटील यांच्या शिफारशीनुसार युवराज म्हस्के यांची प्रकोष्ठाच्या पश्चिम महाराष्ट्र संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली. श्री.गणेशकाका जगताप यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
जेजुरी, ता.पुरंदर, जि. पुणे येथे पंचायतराज व ग्रामविकास विभाग,महाराष्ट्र चे प्रदेश संयोजक श्री.गणेशकाका जगताप, प्रदेश सहसंयोजक राजीव शर्मा, श्री.अंकुशजी देशमुख, श्री.माऊली वाघमोडे, भाजप किसान मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.माऊली चौरे, ज्येष्ठ स्थानिक भाजप नेते श्री.प्रसाद अत्रे, श्री.जीवनजी कुलकर्णी, श्री.हरिश्चंद्रजी भापकर, श्री.राजेंद्रजी कुदळे, श्री.तुकारामजी यादव यांनी बैठकीत भाजप पंचायतराज व ग्रामविकास विभागाच्या कार्यांविषयी व जबाबदाऱ्यांविषयी चर्चा झाली.