मराठा रोजगारासाठी वीरेंद्र पवार चांगले काम करत आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ प्रशिक्षण अन् भांडवल उपलब्ध करून दिले आहे. आजपर्यंत २३ हजार कर्जदारांना रोजगार अन् भांडवल उपलब्ध करून दिले आहे. स्वारद फाऊंडेशन आयोजित उद्योजकता मार्गदर्शन मेळावाही यशस्वी नक्कीच होईल असे मत श्री. चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री यांनी व्यक्त केले. स्वारद फाऊंडेशन आयोजित उद्योजकता मार्गदर्शन मेळावा व रक्तदान शिबीराचे उद्दघाटन श्री. चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री पुणे, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्र उद्योग आणि संसदीय कार्य महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी अँड. मा. शशिकांतजी पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ, सौ. शैलाताई वानखेडे, संकेत लोहार समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पुणे, शंकरनाना मोहोळ सरपंच मुठा, निमंत्रक सौ. स्वातीवहिनी शरद मोहोळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले वार्षिक उत्पन्न ८ लाख धारकांनाच आरक्षण दिले जात असतानाही समाजाचे महान नेते समाज दुर्लक्षित असतानाही राजकारण केले जात आहे त्यांनी अनेक संस्था सूरू केल्या अन् कारखाने काढले पण समाजहित पाहिले नाही अशी टीका शरद पवारांवर केली.
राज्यात वार्षिक २० हजार नोकऱ्या मिळत होत्या. त्यातून समाजाच्या मागण्या पुर्ण होत नाहीत म्हणून मराठा महासंघ निवडणुकीसाठी काम न करता, आर्थिक विकास साधण्यासाठी महामंडळ करत असून स्वारद फाउंडेशन ही हीच भूमिका मांडत आहेत. स्वातीवहिनी शरद मोहोळ यांचे कामही उल्लेखनीय आहे. यावेळी ॲड. शशिकांत पवार यांनी बोलताना क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज ते अखिल मराठा महासंघ असा प्रवास सांगितला. कै. आण्णासाहेब पाटील यांच्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काम केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय जनता पक्षाचे माझे नगरसेवक वैभव मुरकुटे यांनी केले.