नवी दिल्ली : देशातील दोन दिग्गज उद्योजकांची नावे जागतिक श्रीमंतांच्या टॉप यादीत झळकत आहेत. मुकेश अंबानी यांना पिछाडीवर टाकत गौतम अदाणी यांनी यांनी आघाडी घेतली आहे. तरीही रिलायन्स इंडस्ट्रीज मूल्यमापन, महसूल आणि नफा या महत्त्वाच्या पॅरामीटर्सवर अग्रेसर आहे. बुरगुंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया 500 यादी, 2022 मध्ये याविषयीचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, भारतातील आघाडीच्या अदानी, अंबानी, टाटासह इतर कंपन्यांचा अनेक क्षेत्रात बोलाबाला असल्याचे दिसून येते. या यादीत दुसऱ्या वर्षीही रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान अबादित ठेवले आहे. ही भारतातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी ठरली आहे. कंपनीची व्हॅल्यू, मूल्य 17.25 लाख कोटी रुपये आहे. कंपनी दरवर्षी 3.6 टक्क्यांची वृद्धी नोंदवत आहे.

अधिक वाचा  500 वर्षानंतर धुमधडाक्यात अयोध्येमध्ये राम नवमी साजरी होणार; 19तास होणार रामलल्लाचे दर्शन

या यादीतील टॉप-10 कंपन्यांची एकूण मूल्य हे 72 लाख कोटी रुपये इतके आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा वाटाच जवळपास 25 टक्के आहे. अहवालानुसार, या टॉप-10 कंपन्या भारताच्या एकूण सकल उत्पादनाच्या 37 टक्के आहेत. हुरुन इंडियाने या कंपन्यांचे मूल्य जीडीपीच्या 8.9 टक्के असल्याचा दावा केला आहे. 11.68 लाख कोटींचे मूल्यासह टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. टीसीएस 5,92,195 नोकरी देणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. इतर कंपन्या त्यामानाने आघाडीवर नाहीत. दुसरीकडे रिलायन्सची दरवर्षी जोरदार घौडदौड सुरु आहे. या कंपनीचे मूल्य 10.52 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. तर टीसीएसचे मूल्य 4.4 लाख कोटी रुपयांने वाढले आहे. इतर कंपन्यांचे मूल्यही वाढले आहे. पण या दोन कंपन्यांनी त्यात आघाडी घेतली आहे.