बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याला अलीकडेच मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने अडवले. त्याच्या बॅगेत महागडी घड्याळे सापडली. त्यावर त्याने आवश्यक शुल्क भरले. परंतु किंग खानला विमानतळावर अडवल्याची बातमी झाली. गेल्याच वर्षी भारतीय क्रिकेट संघातला स्टार क्रिकेटर हार्दिक पंड्या असाच अडचणीत आला होता. त्याने दुबईहून परतताना दीड कोटी रुपये किमतीचे घड्याळ आणले. मुंबई विमानतळावर तपासणीत ही बाब उघड झाल्यावर त्याची देशभर चर्चा झाली. पंड्याने आवश्यक शुल्क भरून घड्याळ सोडवले. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर सेलिब्रिटींना अडवून त्यांच्याकडील सामानाची पाहणी केली आणि त्यात वरीलप्रमाणे काही महागडी घड्याळे आढळली की त्याची आधी चर्चा होते आणि नंतर त्याचे बातमीत रूपांतर होते. काय असते असे विशेष सेलिब्रिटींच्या घड्याळांमध्ये? या घड्याळ्यांच्या किमती हे त्यामागचे इंगित. घड्याळ म्हटले तर वेळ दाखवणारे एक यंत्र. मात्र, काळानुरूप या यंत्रात प्रचंड बदल झाले.

अधिक वाचा  वडिलांनी माझ्यासाठी ती एक गोष्ट आजवर केली नाही; अमित ठाकरेंकडून खंत व्यक्त

भिंतीवरच्या लंबकाच्या घड्याळापासून डिजिटल वॉचपर्यंत आणि कमरेला लावलेल्या घड्याळापासून हातावरच्या स्मार्ट वॉचपर्यंत अनेक बदल या घड्याळाने अनुभवले आहेत. या घड्याळांचीही गंमत आहे. सामान्यांच्या हातात ते वेळ दाखवणारे असते तर उच्चभ्रूंच्या वर्तुळात स्टेट्स सिम्बॉल…

ही आहेत निवडक उच्चभ्रू घडाळे 

पाटेकफिलीप स्टेनलेस स्टील

किंमत : १२ दशलक्ष डॉलर

भारतीय रुपयांत : ९८ कोटी ०१ लाख ७० हजार २७२

जेकब अँड कंपनी बिलेनियर वॉच

किंमत : १८ दशलक्ष डॉलर

भारतीय रुपयांत : १ अब्ज ४७ कोटी २९ लाख २२ हजार २३४

रोलेक्स डेटोना युनिकॉर्न

किंमत : ६.१ दशलक्ष डॉलर

अधिक वाचा  उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या यादीमुळे आज महाविकास आघाडीतील एक नेता बनू शकतो बंडखोर

भारतीय रुपयांत : ४९ कोटी ३४ लाख ९४ हजार ८४३

रोलेक्स पॉल न्यूमन डेटोना

किंमत : १८.७ दशलक्ष डॉलर

भारतीय रुपयांत : १ अब्ज ५२ कोटी ४५ लाख २५ हजार ८०२

पाटेक फिलीप हेन्री ग्रेव्हज

सुपर कॉम्प्लिकेशन :

किंमत : २६ दशलक्ष डॉलर

भारतीय रुपयांत : २ अब्ज १२ कोटी २७ लाख ८१ हजार ७००

वाचेरॉन काँस्टन्टाइन

किंमत : ८ दशलक्ष डॉलर

भारतीय रुपयांत : ६५ कोटी ३४ लाख ४६ हजार ८४८

चोपार्ड

२०१ कॅरेट

किंमत : २५ दशलक्ष डॉलर

भारतीय रुपयांत :२ अब्ज ०३ कोटी १३ लाख ०१ हजार २५०

पाटेक फिलीप वर्ल्डटायमर

किंमत : ५.५ दशलक्ष डॉलर

भारतीय रुपयांत : ४४ कोटी ८४ लाख ५७ हजार ५८६

अधिक वाचा  शरद पवारगटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी; यंदा तिरंगी लढती अनिवार्यच? बारामती, माढा, बीडमधून कोण?

ब्रेग्यू ग्रॅण्ड कॉम्प्लिकेशन मारी अंत्वानेत

किंमत : ३० दशलक्ष डॉलर

भारतीय रुपयांत : २ अब्ज ४५ कोटी

०४ लाख २५ हजार ६८०

ग्राफ डायमंड्स हॅल्युसिनेशन

किंमत :५५ दशलक्ष डॉलर

भारतीय रुपयांत : ४ अब्ज ४८ कोटी ३७ लाख २५ हजार ८४०

ग्राफ डायमंड्स द फॅसिनेशन

किंमत :४० दशलक्ष डॉलर

भारतीय रुपयांत :३ अब्ज २६ कोटी ७८ लाख ७२ हजार

पॅटेक फिलीप ग्रॅण्डमास्टर चाइम

किंमत : ३१ दशलक्ष डॉलर

भारतीय रुपयांत : २ अब्ज ५३ कोटी १० लाख

जॅगर-ला कल्चर जाओलेरी १०१ मॅन्शेट

किंमत : २६ दशलक्ष डॉलर

भारतीय रुपयांत : २ अब्ज १२ कोटी २७ लाख ८१ हजार ७००