पुणे महानगरपालिका व साहित्यिक कट्टा वारजे तर्फे परीसरातील वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी व महाविद्यालयीन आणि शैक्षणिक विद्यार्थ्यांना मराठी संस्कृतीची ओळख करून देण्याच्या हेतूने गंगाबाई धुमाळ बालोद्यान व विरंगुळा केंद्र ईशान नगरी शेजारी वारजे पुणे येथे ‘शब्दब्रम्ह’ 4 दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. डॉ. रामचंद्र देखणे यांचे स्मरण कायम रहावे म्हणून डॉ.रामचंद्र देखणे पुण्यातील पहिले ग्रंथालय सुरु करण्यात आले असून उद्घाटन सुप्रसिद्ध लेखिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते होणार आहे.

व्याख्यान मालेचे स्वरूप खालील प्रमाणे:-

सोमवार दि. २८ नोव्हेंबर सायं ६:०० वा

अधिक वाचा  कॅप्टन हार्दिक पंड्याला जबरदस्त फटका, मॅचविनर खेळाडू आणखी सामन्यांना मुकणार

डॉ. भावार्थ देखणे यांचे ‘महाराष्ट्राची लोककला’ या विषयावर व्याख्यान

मंगळवार दि. २९ नोव्हेंबर सांय ६.०० वा

वि.दा. पिंगळे यांचे ‘लोकसेवक संत गाडगेबाबा’ या विषयावर व्याख्यान

बुधवार दि. ३० नोव्हेंबर रोजी सांय ६.०० वा

मा. संजय आवटे यांचे ‘गांधी आडवा येतो’ या विषयावर व्याख्यान

गुरुवार दि. १ डिसेंबर रोजी सांय ६.०० वा.

डॉ. प्राचार्य सुधाकर जाधवर यांचे भारतीय समाजाची सद्यस्थिती या विषयावर व्याख्यान होईल.

असे आयोजक मा. श्री. प्रदिप उर्फ बाबा धुमाळ (मा. अध्यक्ष, शिक्षण मंडळ पुणे म.न.पा ) तसेच सौ. दिपालीताई धुमाळ (मा. विरोधी पक्षनेत्या पुणे म.न.पा ) यांनी कळविले आहे.