ठाणेः योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलता बोलता ते म्हणाले, महिलांनी साडी नेसली तरी छान दिसतात. सलवार कमीज घातलं तरी छान दिसतात… माझ्या मते तर काही नाही घातलं तरी छानच दिसतात.. रामदेव बाबांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता प्रचंड टीका होत आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

पाहा रामदेव बाबा काय म्हणाले?… असं का म्हणाले?

ठाणे येथे एका संमेलनात रामदेव बाबा यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते. त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांना योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला त्यांनात्रा लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही.

अधिक वाचा  MIM भाजपची ‘B टीम’ अन् पुण्यात उमेदवारीही पराभूत मानसिकतेचे षडयंत्र! पण जनता सुज्ञ झालीय: काँग्रेस

नेमकं काय म्हणाले?

उपरोक्त संदर्भाने बाबा रामदेव यांनी हिंदीत एक विधान केलं. ते म्हणाले, साड्या नेसायला नाही मिळाल्या काही समस्या नाही… आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला ड्रेस (सलवार सूट) मध्येसुद्धा चांगल्या अमृता फडणवीस यांच्या सारख्या चांगल्या वाटतात.. आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असं वक्तव्य राम देव बाबा यांनी केलं.

‘अमृता 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत….’

या कार्यक्रमात अमृता फडणवीसांची बाबा रामदेव यांनी खूप स्तुती केली. ते म्हणाले,‘ अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची एवढी लगन आहे की मला असं वाटतं अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण त्या खूप हिशोबत अन्न ग्रहण करतात. खुश राहतात, जेव्हा बघावं लहान मुलांसारखे हसत असतात. जसे स्मित हास्य अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच स्मित हास्य मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघायचं आहे.