साल 2022 हे टीम इंडियाचा क्रिकेटर दिनेश कार्तिक साठी खूप लकी ठरलं होतं. यावर्षी त्याने नॅशनल क्रिकेट टीममध्य कमबॅक करत चांगला खेळ केला आणि सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला. आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये कॉमेंट्री सुरु करणारा खेळाडू पुन्हा वर्ल्डकप खेळेल असा कधी कोणी विचारही केला नसेल. दरम्यान आता कार्तिकने हार्दिकच्या कर्णधारपदावरून एक मोठं वक्तव्य केलंय.

भारतीय सिलेक्टर्सने हार्दिक पांड्याकडे भावी कर्णधार म्हणून पाहावं, असं कार्तिकचं मत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सिरीजमध्ये नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली. त्यामुळे हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आलं. यावेळी न्यूझीलंडविरूद्धची सिरीज पंड्याने भारताला जिंकवून दिली.यानंतर दिनेश कार्तिक म्हणाला की, “कर्णधार म्हणून हार्दिक पांड्यासाठी न्यूझीलंड सिरीज चांगली होती. त्यामुळे हार्दिक पांड्याला भारतीय टीमचा कर्णधार बनवायला हवं. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याने बहुतांश निर्णय योग्यच घेतले. त्याच्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे टीम इंडियाने सामन्यात पुनरागमन केलंय.”

अधिक वाचा  मी पक्षात दहशतवादी का? राज साहेबांकडे किती वेळा तक्रार करायची? पुण्यात खदखद पुन्हा सूरू

कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कार्तिकने या व्हिडीयोना एक कॅप्शन देखील दिलं आहे. त्याने लिहिलंय, टीम इंडियासाठी वर्ल्डकप खेळणं आणि प्रयत्न करणं ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आम्हाला हे लक्ष्य गाठता आलं नाही मात्र, या वर्ल्डकपच्या प्रवासाने माझ्या आयुष्यात नव्या आठवणी जमा झाल्या आहेत. माझ्या टीममधील इतर खेळाडूंचं, कोचचं, मित्रांचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅन्सच्या अखंड समर्थनासाठी धन्यवाद!दिनेश कार्तिकने आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केली आणि टीम इंडियामध्ये कमबॅक केलं. या सिझनच्या सुरुवातीला पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने त्याच्यावर बोली लावली. कार्तिकने त्याच्या खेळाच्या जोरावर हा विश्वास जिंकून दाखवला.कार्तिकने 16 सामन्यांमध्ये 183 च्या स्ट्राईक रेटने 330 रन्स केला. इतकंच नाही तर टीम इंडियासाठी एक उत्तम फिनीशन म्हणून स्वतःची जागी निश्चित केली.