मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच जिनिलियानं तिचा आगामी मराठी चित्रपट ‘वेड’चा टीझर शेअर केला आहे. हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जिनिलियानं दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

पाहा काय म्हणाली जिनिलिया –
जिनिलायानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे. या टीझरच्या सुरुवातीला रितेश प्रेमाबद्दल बोलताना दिसत आहे. त्यानंतर जोरदार पावसात रितेश फाइट करत असलेला रितेश हा रागात आणि भावूक असलेला दिसत आहे. अशातच त्यात जिनिलियाची एन्ट्री होते. सिगारेटचे झुरके घेत भर पावसात जिनिलियासमोरून जाणारा रितेश सर्वांची उत्कंठा वाढवतो. याशिवाय या टीझरमध्ये रितेशचा ‘प्रेम असतं प्रेमासारखंच, काही वेड्यासारखं प्रेम करतात तर काही प्रेमातं वेड होतात’ हा डायलॉग मनाला भिडणारा आहे.
जिनिलियानं हा व्हिडीओ शेअर करत ‘आवड होती म्हणून हिंदीत अभिनय सुरु केला. प्रेम होतं म्हणून तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपट केले. आणि आता वेड आहे म्हणून मराठीत आलेय. माझ्या वेडचा टीझर प्रदर्शित झाला आहे. तुम्हीही या वेडेपणात सहभागी व्हा.’ असे कॅप्शन दिले आहे

अधिक वाचा  टोयोटा’ला लोकप्रिय करणारे उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखनं केलं आहे. या चित्रपटातून जिनिलियानं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या पूर्वी जिनिलीयानं हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘वेड’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर अनेक कलाकार आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. तर जिनिलिया या चित्रपटाची निर्माती आहे.