नवले पूल गेल्या काही दिवसांपासून अपघातांमुळे चर्चेत आहे. नुकतंच या पुलावर मोठ्या प्रमाणावर गाड्यांना कंटेनरची धडक बसली. त्या अपघातामुळे इथल्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पुणेकरांनी या पुलावर एक पुणेरी पाटी लावली आहे.
या मोठ्या अपघातानंतर त्याच रात्री लगेचच आणखी दोन अपघात या ठिकाणी झाले. त्यामुळे प्रशासनाचं इथल्या सुरक्षेकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावधान पुढे नवले पूल आहे, असे फ्लेक्स नवले पूल इथं लावण्यात आले आहेत. तसंच प्रवाशांच्या जनजागृतीसाठी हे पोस्टर लावण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे. फोटो लावण्यात आला आहे. असे पोस्टर्स जांभूळवाडीपासून नऱ्हे सेल्फी पॉईंटपर्यंत लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले आहेत.
या फ्लेक्सवर ‘सावधान…पुढे नवले ब्रीज आहे’, अशी सूचना लिहिलेली आहे. तर त्यावर तीव्र उतार आणि एका कावळ्याचा फोटो लावण्यात आला आहे. असे पोस्टर्स जांभूळवाडीपासून नऱ्हे सेल्फी पॉईंटपर्यंत लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले आहेत.